Home /News /lifestyle /

हुडहुडी घालवण्यासाठी कडाक्याच्या थंडीत बिलकुल पिऊ नका दारू नाहीतर...

हुडहुडी घालवण्यासाठी कडाक्याच्या थंडीत बिलकुल पिऊ नका दारू नाहीतर...

खरंच थंडीत (cold) दारू पिणं योग्य आहे का? दारू प्यायल्यामुळे शरीराचं तापमान वाढतं का? थंडीपासून (winter) बचाव होतो का?

नवी दिल्ली, 29 डिसेंबर : थंडी (Cold) सुरू झाली आहे. उत्तर भारतात थंडीची लाट (Cold Wave in North India) येण्याचा अंदाज हवामान विभागाने (IMD Forecast) वर्तवला आहे. थंडी आणि दारू हे अनेकांसाठी एक समीकरणच आहे. थंडीच्या दिवसात मद्यपान (Alcohol) केल्यास शरीर गरम राहते, असा लोकांमध्ये समज आहे. पण खरंच थंडीत दारू पिणं योग्य आहे का? दारू प्यायल्यामुळे शरीराचं तापमान वाढतं का? थंडीपासून बचाव होतो का? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. कडाक्याच्या थंडीत रात्रीच्यावेळी मद्यपान केल्याने शरीरात गरमी जाणवते. पण असं केल्याने तुमच्या शरीराचं तापमान कमी होतं. आरोग्य विज्ञानाने याबाबत सखोल संशोधन केले आहे. त्यानुसार मद्यपान केल्याने शरीराचे कोअर तापमान कमी होतं आणि हायपोथार्मियाचा धोका वाढतो. उष्णता तयार करण्यापूर्वीच शरीराची उष्णता लक्षणीय कमी होणं याला हायपोथार्मिया असं म्हणतात. यामुळे शरीर थरथरणे, श्वास घेण्यास त्रास होणे आणि रक्तदाब (Blood Pressure) कमी होणे असा त्रास होतो. सामान्यतः शरीराचं तापमान हे 37 अंश सेल्सिअस असते. मात्र मद्यपान केल्याने ते 35 अंश सेल्सिअसपर्यंत कमी होते. यामुळे बोलणं, चालण्यात अडखळणं आणि त्वचा थंड पडू लागते. जास्त थंडीत मद्यपान केल्यानं हायपोथार्मियाचा गंभीर स्वरुपात त्रास होऊ शकतो. एका अभ्यासानुसार, जादा मदयपान केल्याने हायपोथार्मियाच्या घटनांमध्ये 68 टक्क्यांनी वाढ होते. हे वाचा - इथे केला जातो चक्क सापांना पाठीवर सोडत मसाज, VIDEO पाहून बसेल धक्का अल्कहोल हे व्हॅसोडीलायटर या औषधाच्या समकक्ष मानलं जातं. यामुळे रक्तवाहिन्या ताणल्या जातात. या वाहिन्यांमधून जादाप्रमाणात रक्तवहन होऊन ते त्वचेत अधिक प्रमाणात पोहोचतं. यामुळे काही वेळ तुम्हाला उष्णता जाणवते पण नंतर घाम येऊ लागतो. त्यानंतर थंड की उष्ण ही बाब तुमच्या शरीराला ओळखण्यात अडचण येते आणि हायपोथार्मियाची स्थिती तयार होते. तज्ज्ञांच्या अभ्यासानुसार, सामान्य किंवा संतुलित तापमानात मद्यपान केलं तर शरीराच्या मूळ तापमानावर कोणताही परिणाम होत नाही. एका अभ्यासानुसार, 2018 मध्ये अमेरिकेतील ज्या भागात थंडीचं प्रमाण अधिक होतं त्या भागात सर्वाधिक दारू विक्री झाली होती. जास्त थंडी पडली की जास्त मद्यपान करायचं असा समज यामधून दिसून येतो. व्हॅसोडीलायटरमुळे (vasodilator) शरीराला असं वाटतं की, मद्यपान केली की उष्णता वाढते, त्यामुळेच मदयपानाची इच्छा वाढते. मात्र ही बाब शरीरासाठी धोकादायक आहे. अति मद्यपान करणं आणि अधिक मृत्यूसंख्या यांच्या मधील संबंध यापूर्वीच अधोरेखित झाला आहे. संशोधनानुसार जर एखादी व्यक्ती एका आठवड्यात 6 ग्लास दारूचं सेवन करीत असेल तर तिचे आयुष्यमान 6 महिन्यांनी कमी होते. हे वाचा - New Year Party : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नववर्षाची पार्टी करताना विसरू नका या 8 गोष्टी भारतीय हवामानशास्त्र विभागाने गेल्या शुक्रवारी दिलेल्या इशाऱ्यानुसार, उत्तर भारतातील पंजाब (Punjab), हरियाणा (Haryana), दिल्ली (Delhi), उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि राजस्थानमध्ये (Rajastan) तापमानात घट होईल. त्यामुळे या भागात 29 डिसेंबरनंतर कडक थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाने या अंदाजासोबत थंडीचा बचाव आणि सावधगिरी बाळगण्याच्या दृष्टीने सल्ला देखील प्रसिद्ध केला होता. त्यानुसार थंडीच्या लाटेदरम्यान मद्यपान करणं टाळावं. कारण यामुळे शरीराचं तापमानही घटतं. तसंच अंग थरथरत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. असं झाल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा, असं यात म्हटलं आहे.
Published by:Priya Lad
First published:

Tags: Health, Lifestyle

पुढील बातम्या