Home /News /lifestyle /

आता मंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत

आता मंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत

भविष्यात माणसाचा मंगळावर जाण्याचा प्लॅन ठरला तर या फळाचे कोंबदेखील माणूस मंगळावर घेऊन जाऊ शकतो.

    क्वीन्सलँड, 27 सप्टेंबर : शास्त्रज्ञ आणि संशोधक विविध प्रयोग करत असतात. अव्हकॉडो या फळाला परदेशात प्रचंड मागणी असते त्यामुळे ते टिकवून ठेवण्यासाठी नवीन संशोधन पद्धत विकसित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शास्रज्ञांना एक वेगळाच मार्ग सापडला आहे. या फळाचे कोंब साठवून ठेऊन ते नंतर वापरता येणार असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे भविष्यात माणसाचा मंगळावर जाण्याचा प्लॅन ठरला तर या फळाचे कोंबदेखील माणूस मंगळावर घेऊन जाऊ शकतो, असं गमतीनी म्हटलं जातंय. Cryo Preserving काय असतं ? सध्या माणसांचं वीर्य आणि अंडपेशी साठवण्यासाठी IVF तंत्रज्ञानात क्रायो प्रिझर्व्हिंग पद्धत वापरतात. 320 अंश फॅरेनहाइट तापमानला वीर्य आणि अंडपेशी गोठवून त्यांचं प्रिझर्व्हेशन केलं जातं. या पद्धतीमध्ये या दोन्हींतील पेशींची रचना तशीच राहते त्यामध्ये अजिबात बदल होत नाही. वाचा-'मीटिंगसाठी VIDEO सुरू केला, तर बॉसने पँटच घातली नव्हती' Online छळाचे प्रकार उघड शास्रज्ञांनी अव्होकॉडोच्या संवर्धनासाठी याच पद्धतीचा वापर करून पाहिला आणि तो यशस्वी झाला. अव्होकॅडोचे कोंब अल्युमिनियमच्या फॉईलमध्ये गुंडाळून त्या लिक्विड नायट्रोजनमध्ये ठेवण्यात आले. हे कोंब नंतर वापरल्यावर त्यांना अंकुर आणि दोन महिन्यांत पालवीही फुटली. या पद्धतीला क्रायोट्युब असं नाव देण्यात आलं आहे. ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड विद्यापीठातील पीएचडीचा विद्यार्थी ख्रिस ओब्रायन म्हणाला, ' हे कोंब क्रायोट्युबमधून काढल्यावर केवळ 20 मिनिटांत ते पूर्ववत होतात आणि 2 महिन्यांच्या कालावधीत या झाडाला पाने देखील येण्यास सुरुवात होते. अवोकॅडोच्या फळाचे संरक्षण करण्याचं कार्य आम्ही करत असून या फळाच्या विविध प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. महत्त्वाचं म्हणजे टिश्यु कल्चर प्रपोगेशन तंत्रज्ञानाचा उपयोग करून तयार केलेल्या क्लोनल कोंबापासून 500 अव्होकॅडोची झाडं उगवू शकतात. त्याचबरोबर विविध फळांचे कोंबही आपण अशाचप्रकारे साठवू शकतो.' वाचा-तुमच्या शरीराची पाण्याची गरज कशी मोजायची? तज्ज्ञांनी सांगितला सोपा फॉर्म्युला त्याचबरोबर लिक्विड नायट्रोजनमध्ये याला साठवून ठेवण्यासाठी कोणत्याही प्रकारची वीज लागत नसल्याने ही पद्धत अतिशय सोपी आहे. याचबरोबर केवळ फळांच्या बियांसाठीही पद्धत फायदेशीर नसून इतर गोष्टींचेदेखील आपण या पद्धतीचा अवलंब करून जतन करून ठेवू शकतो. यासाठी वापरण्यात येणारी cryopreservation ही पद्धत मागील 40 वर्षांपासून अस्तित्वात आहे. मात्र पहिल्यांदाच संशोधकांनी या पद्धतीत केलेल्या नव्या प्रयोगाला यश आलं आहे. वाचा-मासे खायला आवडतात? मग जाणून घ्या त्यांचे 5 फायदे अशा पद्धतीने झाडांचे कोंब सुरक्षित ठेवण्यामागे आणखीही उद्देश आहे अव्हकॅडो या फळाच्या झाडांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. जंगलातील वणवे, उंदीर किंवा इतर किड्यांनी वृक्षांची मूळं नष्ट करणं किंवा फ्लोरिडात आलेला लॉरल विल्टसारखा रोग यामुळे अव्हकॅडोची झाडं संकटात आहेत. त्यामुळेही या प्रजातीचं संरक्षण करणं गरजेचं आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या