जेवल्यानंतर चुकूनही करू नका 'या' 6 गोष्टी

जेवल्यानंतर चुकूनही करू नका 'या' 6 गोष्टी

जेवणानंतर काहीजण नकळतपणे काही कामे करतात त्याने शरीरावर ताण येतो. पचनक्रियेवरही त्याचा परिणाम होतो. त्यामुळे तुम्ही जेवल्यावर काय करता हे देखील महत्त्वाचं आहे. जाणून घ्या जेवणानंतर कोणती कामे करणे टाळावे.

  • Share this:

मुंबई, 26 जुलै : निरोगी आरोग्यासाठी आपण सर्व कायमच खाण्या-पिण्याच्या गोष्टींवर लक्ष देऊन असतो. डॉक्टारांच्या सल्ल्यानुसार आपण पथ्यदेखील पाळतो. आवडी-निवडीनुसार आणि गरजेनुसार आपण आहारात अनेक पौष्टीक गोष्टींचा समावेश करतो. पण, निरोगी आणि सुदृढ शरीराकरीता तेवढचं आवश्यक नसून अन्नाचं व्यवस्थित पचन होणेही गरजेचं आहे. ते अवलंबून आहे तुमच्या खाण्याव्यतिरीक्त असणाऱ्या सवयींवर. जेवणानंतर काही जण नकळतपणे काही कामं करतात त्याने शरीरावर ताण येतो. पचनक्रियेवरही त्याचा परिणाम होतो. त्यामुळे तुम्ही जेवल्यावर काय करता हे देखील महत्त्वाचं आहे. जाणून घ्या जेवणानंतर कोणती कामं करणं टाळावं.

फळं खाऊ नयेत

अनेकांना जेवल्यानंतर लगेचच फळं खाण्याची सवय असते. जेवल्यावर पोटामध्ये त्यावर पचनाची क्रिया चालू असते. त्यातच तुम्ही जेवल्यावर फळं खाल्याने त्याचे पोषक घटक पोटापर्यंतत पोहोचत नाहीत. म्हणजेच त्याचं व्यवस्थित पचनही होत नाही.

हे वाचा - शाहरुखच्या मुलासोबत दिसलेली ही मिस्ट्री गर्ल आहे तरी कोण?

भोजन झाल्यावर फळ खाऊ नयेत. कारण, पोटात गॅस निर्माण होतो. जेवायच्या आधी एक तास किंवा जेवल्यानंतर दोन तासांनी फळं खावीत. सकाळी रिकाम्या पोटी तुम्ही फळं खाणं उत्तम.

जेवल्यावर स्नान करु नये

जेवल्यावर लगेच अंघोळ करू नये. जेवल्यावर अंघोळ केल्यास  रक्‍तप्रवाह हात, पाय आणि शरीराच्या इतर भागात वाढतो. पोटाच्या आजूबाजूचा रक्‍तप्रवाह कमी होतो. त्यामुळे पचनसंस्था कमजोर होते.

चहाचं पिणं टाळा

अनेकांना जेवल्यावर चहा पिण्याची इच्छा होते. तुम्हालाही अशीच सवय असल्यास वेळीच सावधान व्हा. कारण, ते शरीराकरीता अत्यंत हानिकारक आहे. चहाच्यापूडीमध्ये भरपूर प्रमाणात अ‍ॅसिडचे प्रमाण असतं. त्यामुळे आहारातील प्रथिनांचे नुकसान होते. परिणामी, अन्न पचण्यामध्ये खूप त्रास होतो. जेवल्यानंतर चहा घ्यायचा असल्यास किमान एका तासाच्या वेळेनंतर घ्यावा.

ध्रूम्रपान करू नये

ध्रम्रपान शरीरासाठी हानिकारक आहेच. त्याचं व्यसन असणाऱ्या लोकांना ते कधीही करायची इच्छा होते. मात्र जेवणानंतर लगेच त्याचे सेवन करणे वाईट आहे. तज्ज्ञांच्या मते जेवणानंतर लगेचच सिगारेट प्यायल्यास पचनासंबंधी समस्या निर्माण होतात. कारण, जेवल्यानंतर लगेच सिगारेट प्यायल्यास गॅस्ट्रिक आणि पित्त यांची समस्या ओढावतात.

सावधान! तुम्ही थर्मोकॉलच्या कपामध्ये चहा पिता का? जाणून घ्या काय आहेत गंभीर परिणाम

लगेच झोपणं टाळावे

चविष्ट जेवणानंतर चांगली झोप येणे साहजिकच आहे. अनेकांना अन्नाचे सेवन करुन लगेच झोपायची सवय असते. पण असे करणे शरीरासाठी नक्कीच हानिकारक आहे. अन्न पोटात गेल्यावर त्यावर पचनक्रिया होण्यास वेळ लागतो. त्यामुळे लगेच झोपल्यावर अन्न पचन होत नाही. गॅसेस आणि आतड्यांमध्ये संसर्ग होण्याची समस्या निर्माण होते.

लगेच चालणं, फिरणं टाळा

चालणे किंवा पायी फिरणे शरीराकरीता चांगलं आहे. पण, जेवण झाल्याबरोबर चालायला जाऊ नये. त्यामुळे पोटातील आम्ल घशापर्यंत येतं आणि अपचनाची समस्या निर्माण होते. जेवण झाल्यानंतर अर्ध्या तासाने शतपावली करणं किंवा चालणंही उत्तम.

----------------------------------------------------------------------------------------

VIDEO: लोकसभेत नवनीत राणा भडकल्या, आझम खान यांच्या वक्तव्यावरून गोंधळ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 26, 2019 04:50 PM IST

ताज्या बातम्या