Home /News /lifestyle /

Shocking! त्याच्या प्रायव्हेट पार्टला चावला भलामोठा अजगर आणि...

Shocking! त्याच्या प्रायव्हेट पार्टला चावला भलामोठा अजगर आणि...

टॉयलेट सीटवर (Snake in Toilet) बसताच या व्यक्तीला सापाने दंश केला (Python Snake bites on private part).

    ऑस्ट्रिया, 06 ऑगस्ट : दिवस उजाडला की आजचा दिवस आपला चांगला जावो अशीच आशा करतो. पण एका व्यक्तीसाठी दिवसाची सुरुवातच इतकी भयानक होईल, असं वाटलंही नव्हतं. सकाळी टॉयलेटला (Python Snake Hidden In Bathroom) बसताच त्या व्यक्तीच्या चक्क गुप्तांगालाच भल्यामोठ्या अजगराने चावा (Python Snake bites on private part) घेतला आहे. त्यानंतर त्याला रुग्णालयात भरती करावं लागलं. ऑस्ट्रियात (Austria) एका व्यक्तीवर अजगराने हल्ला (Python Snake Attack) केला आहे. चक्क त्याच्या प्रायव्हेट पार्टला साप चावला आहे (Snake Bites On Genitals).  टॉयलेटमध्ये हा साप लपून बसला होता (Snake in Toilet). हे वाचा - कमोडमधून येत होता विचित्र आवाज; उघडताच... ; पुढे काय झालं पाहा VIDEO 65 वर्षांची व्यक्ती सकाळी सहा वाजता बाथरूममध्ये गेली. टॉयलेट सीटवर बसली. त्यावेळी प्रायव्हेट पार्टला त्याला काहीतरी टोचल्यासारखं वाचलं. त्याने खाली वाकून पाहिलं तर घामच फुटला. त्याला जे टोचलं तो एक भलामोठा साप होता. हा साप त्याच्या प्रायव्हेट पार्टला चावला होता. त्याला पाहताच ती व्यक्ती धाडकन उभी राहिली. या व्यक्तीला प्रायव्हेट पार्टमध्ये तीव्र वेदना होऊ लागल्या. ती मोठमोठ्याने ओरडू लागला. त्याच्या घरच्यांनी त्याला तात्काळ रुग्णालयात नेलं. हे वाचा - हे काय? LIVE REPORTINGवेळी मागे वळून पाहताच घाबरला पत्रकार; कॅमेऱ्यासमोरून पळाला रेस्क्यू टीम सापाला पकडण्यासाठी त्या व्यक्तीच्या घरी आली. तब्बल 5 फूट लांबीचा हा एल्बिनो पायथन होता. या व्यक्तीवर उपचार करण्यात आले. त्याच्या प्रकृतीत आता सुधारणा असल्याचं सांगितलं जातं आहे. पण सुदैवाने सापाने दंश करून सोडलं नाहीतर यापेक्षाही मोठी दुर्घटना होऊ शकली असती, असं डॉक्टर म्हणाले.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: PRIVATE part, Python snake, Shocking news, Snake, Snake video, World news

    पुढील बातम्या