Home /News /lifestyle /

आधी वाटला ट्युमर पण... तरुणीच्या डोकेदुखीचं खरं कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का

आधी वाटला ट्युमर पण... तरुणीच्या डोकेदुखीचं खरं कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का

डोकेदुखीमुळे (headache) हैराण झालेल्या या तरुणीच्या मेंदूत असं काही दिसलं ज्याची कल्पनाही आपण केली नसेल.

    मेलबर्न, 05 ऑक्टोबर : डोकं दुखू (headache) लागलं की एखादं पेनकिलर घेऊन आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. डोकेदुखीची (head pain) अनेक कारणं असतात, डोकेदुखीचे प्रकारही वेगवेगळे असतात. मात्र आपण सामान्य म्हणून डोकेदुखीला गांभीर्याने घेत नाही. ऑस्ट्रेलियातील एका डोकेदुखीचं असं कारण समोर आलं आहे, ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. या तरुणीच्या डोक्यात चक्क अळ्या (tapeworm egg in head) होत्या. या तरुणीला सुरुवातीला महिन्याला दोन-तीन वेळा तिला अशा असह्य वेदना व्हायच्या. मायग्रेन म्हणून ती मायग्रेनवरील औषध घ्यायची. औषध घेतल्यानंतर तिला डोकेदुखीपासून आराम मिळायचा. मात्र यानंतर तिचं डोकं इतकं दुखू लागलं की या वेदना एका आठवड्यापेक्षाही अधिक वेळ होत्या. इतकंच नव्हे तर तिच्यातील लक्षणं गंभीर होऊ लागली. तिला धूसर दिसून लागलं. अखेर ती डॉक्टरांकडे गेली. डॉक्टरांनी सुरुवातीला तिचा एमआरआय काढला. त्यामध्ये तिच्या मेंदूत ट्युमर असल्याचं वाटलं. मात्र जेव्हा नीट तपासणी केली तेव्हा तो ट्युमर नाही तर टेपवॉर्म होते. अळ्यांनी भरलेली एक गाठ होती.  याला न्यूरोकाइस्टिसरोसिस म्हटलं जातं. मेंदूमध्ये लार्वा अल्सर विकसित होतं आणि न्यूरोलॉजिकल लक्षणं दिसू लागतात. हे वाचा - लगेच सोडा नखं चावण्याची सवय नाहीतर पडेल भारी; विचारही केला नसेल इतकी घातक ठरेल टेमवॉर्म आतड्यांमध्ये असतात. हे एक प्रकारचं संक्रमण आहे, ज्याला टेनिआसिस म्हटलं जातं. कोणत्याही औषधांशिवाय हे जंत शरीरातून बाहेर निघतात. दूषित खाद्यपदार्थ, अशुद्ध पाणी आणि मातीच्या संपर्कात आल्याने याची अंडी शरीरात जातात. यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या मते, ज्या लोकांच्या आतड्यांमध्ये जंत असतात, त्यांच्या मलातील परजीवीची अंडी जर कोणत्याही व्यक्तीच्या तोंडात गेले तर हे संक्रमण होऊ शकतं. न्यूरोकाइस्टिसरकोसिसक हे खूप घातक आहे. हे वाचा - आवाजावरूनच ओळखतो व्यक्ती; अंधत्वावर मात केलेल्या टेलिफोन ऑपरेटरचे मंत्रीही फॅन मेंदूमध्ये अळ्या असण्याचं हे पहिलंच प्रकरण नाही. तर याआधी टेक्सामधील एका व्यक्तीच्या डोक्यातही अशा अळ्या सापडल्यात. ज्यामुळे त्याला एक-दोन नाही तर तब्बल दहा वर्षांपासून डोकेदुखीची समस्या होती.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Health, Lifestyle, Pain, Swelling in brain, Tapeworm

    पुढील बातम्या