Home /News /lifestyle /

Shocking! दारूची बाटली दिसताच ढोसली; ड्रिंक करताच कोमात गेली व्यक्ती

Shocking! दारूची बाटली दिसताच ढोसली; ड्रिंक करताच कोमात गेली व्यक्ती

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - AFP)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - AFP)

दारू प्यायल्यानंतर ही व्यक्ती जमिनीवर कोसळली आणि आता जीवनमृत्यूशी झुंज देते आहे.

    कॅनबेरा, 19 फेब्रुवारी : दारू प्यायल्यानंतर त्याची नशा चढते, शरीरावर नियंत्रण राहत नाही, ज्यामुळे व्यक्तीला नीट बोलता येत नाही किंवा नीट चालता येत नाही, ती व्यक्ती आपला तोल सांभाळू शकत नाही किंवा ती व्यक्ती अचानक पडते आणि बेशुद्ध होते हे तुम्ही पाहिलं असेल. पण दारू प्यायल्यानंतर कधी कुणी कोमात गेल्याचं तुम्ही ऐकलं आहे का? ऑस्ट्रेलियातील एक व्यक्ती दारू प्यायल्यानंतर कोमात गेली आहे. याचं धक्कादायक कारण समोर आलं आहे. 43 वर्षांचा हँस मोर्कोस फार्मासिस्ट आहे. त्याला आपल्या औषधांच्या दुकानात एका पार्सलमध्ये दारूची बाटली सापडली. दारूची बाटली दिसल्यानंतर ती पिण्यापासून तो स्वतःला रोखू शकला नाही. तो त्या बाटलीतील दारू प्यायला. त्यानंतर तो जमिनीवर कोसळला आणि आता कोमात असून तो जीवनमृत्यूशी झुंज देतो आहे. डेली मेलच्या रिपोर्टनुसार पोलीस प्रवक्तांनी दिलेल्या माहितीनुसार  एका महिलेने त्याला भयंकर अवस्थेत पाहिलं आणि अॅम्बुलन्स बोलावली. त्याला  रॉयल प्रिंस अल्फ्रेड रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जिथं तो कोमात गेला आहे. हे वाचा - कोपराला छोट्याशा दुखापतीनंतर त्याला झाली भयंकर डोकेदुखी; रिपोर्ट पाहून हादरला खरंतर या दारूच्या बाटलीत दारू नव्हे तर लिक्विड मेथामफेटामाइन होतं आणि हेच मेथ तो दारू समजून प्यायला. मेथमफेटामाइन हे खतरनाक ड्रग आहे. हे ड्रग दारूच्या बाटलीत कसं आलं याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. पोलिसांनी या घटनेचा अधिक तपास सुरू केला आहे. फार्मसीतील सामान जप्त करण्यात आलं आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Australia, Health, Lifestyle, World news

    पुढील बातम्या