कॅनबेरा, 08 एप्रिल: जुळ्या बहिणी (Twin sister) किंवा भाऊ (Twin brother) म्हटलं कि त्यांचे पालक सामान्यपणे त्यांना सारखेच कपडे घालताना दिसतात. अशी काही जुळी भावंडं (Twins) तुम्ही पाहिली असतील जी दिसायला अगदी सेम टू सेम दिसतात. काढीमात्रही त्यांच्यात फरक नसतो. त्यांनी एकसारखे कपडे घातले की त्यांना ओळखणंच अशक्य. मात्र कधी कधी ही जुळी भावंडं सारखी दिसत असली तरी त्यांच्या आवडी-निवडी आणि स्वभाव वेगळा असतो, तर काहींचा अगदी त्यांच्या दिसण्याप्रमाणेच सेम टू सेम. सध्या अशाच अगदी सेम टू सेम आवडीनिवडी असणाऱ्या जुळ्या बहिणी सोशल मीडियावर चर्चेत आहेत. ज्यांचा चक्क बॉयफ्रेंडही एक आहे आणि त्यांना एकत्रच प्रेग्नंट व्हायचं आहे.
ऑस्ट्रेलियातील एना आणि लुसी डिसिंक या जुळ्या बहिणी म्हणजे दोन शरीर आणि एक जीव अशाच आहेत. त्या प्रत्येक गोष्ट एकत्र करायला आवडते. त्या फक्त सारखे कपडे घालतात असं नाही. तर त्यांचं खाणं-पिणं, वर्कआऊट, झोपणं अशी दैनंदिन कामंही एकत्रच असतात. अगदी अंघोळ करतानाही त्या एकत्रच करतात आणि वॉशरूममध्येही एकत्रच जातात.
हे वाचा - 5 वर्षे वेदना, हळूहळू आकारही वाढला; मुलीच्या पोटाचा रिपोर्ट पाहून डॉक्टरही हैराण
एका शोमध्ये दिलेल्या मुलाखतीत या बहिणींनी दावा केला की त्या जगातील सर्वात जवळ असलेल्या अशा जुळ्या बहिणी आहेत, ज्या प्रत्येक गोष्ट एकत्र करतात. त्यामुळे त्यांना आता वेगळं करणं, त्यांच्यात दुरावा निर्माण करणंच कठीण झालं आहे.
एना आणि लुसीचा बॉयफ्रेंड एकच आहे. 2012 साली एना आणि लुसीची भेट मेकॅनिक असलेल्या 40 वर्षांच्या बेनसोबत झाली. बेन या दोघींकडे आकर्षित झाला. त्याला या दोघींसोबत लग्नही करायचं आहे. आता तर या बहिणींना बेनच्याच मुलांची आई व्हायचं आहे, तेसुद्धा एकाच वेळी. हो त्यांना प्रेग्नंटही एकत्रच व्हायचं आहे.
हे वाचा - महिला डान्सर Rock, प्रेक्षक शॉक! डान्स करताना ऑन स्टेज बदलला ड्रेस; VIDEO VIRAL
पण ऑस्ट्रेलियातील विवाह कायदा या तिघांसाठीही अडचणीचा ठरू शकतो. ऑस्ट्रेलियातील विवाह कायदा 1961 नुसार एकच व्यक्ती दोन लग्न करू शकत नाही. यावरूनच आपल्या लग्नाची आधीपासूनच तयारी करणाऱ्या या बहिणी शोमध्ये भावुकही झाल्या होत्या. त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Australia, Boyfriend, International, Love, Pregnancy, Pregnant, Relationship