कॅनबेरा, 11 डिसेंबर : कोरोना लशींचं (corona vaccine) ट्रायल सुरू आहे. या लशींचे काही दुष्परिणामही समोर येत आहे. लस घेतल्यानंतर काही जणांना त्याचा त्रास होतो आहे, इतर आजार समस्या उद्भत आहेत. त्यामुळे याआधी तात्पुरत्या स्वरूपात ट्रायल थांबवण्यातही आले आहे. ऑस्ट्रेलियामध्येही अशाच एका कोरोना लशींचं (Covid-19 Vaccine) क्लिनिकल ट्रायल (Clinical Trial) थांबवलं आहे आणि याचं कारण म्हणजे कोरोना लस घेतल्यानंतर HIV इन्फेक्शन झाल्याचं निदान झालं.
ऑस्ट्रेलियातील (australia) क्विंसलँड युनिव्हर्सिटी आणि बायोटेक कंपनी सीएसएलद्वारे तयार करण्यात आलेली कोव्हिड 19 लस. जुलैपासून या लसीचं परीक्षण सुरू होतं. ट्रायलमध्ये या लशीचे गंभीर परिणाम दिसून आले नाहीत मात्र जेव्हा रिपोर्ट काढला तेव्हा रिपोर्टमध्ये ट्रायलमधील सहभागी व्यक्तींना एचआयव्ही संक्रमण दाखवत होतं. यानंतर कंपनीनं तात्काळ क्लिनिकल ट्रायल थांबवलं आहे.
सीएसएलने ऑस्ट्रेलियातील शेअर बाजारला दिलेल्या माहितीनुसार,ट्रायलमध्ये सहभागी झालेल्या 216 लोकांवर कोणत्याही प्रकारचा गंभीर दुष्परिणाम दिसून आला नाही शिवाय आरोग्याला कोणतीही हानी पोहोचू नये यासाठी लशीची सुरक्षितता तपासली होती. तरीदेखील णामांमट्रायलच्या परिध्ये एचआयव्ही असल्याचं दिसून आलं मात्र पुढे तपासणी केली असता त्या व्यक्तींना प्रत्यक्षात एचआयव्ही नव्हताच. लशीमुळे अँटिबॉडी तयार झाल्या आणि एचआयव्ही संक्रमणाचे चुकीचे रिपोर्ट येऊ लागले, असं स्पष्टीकरण कंपनीनं दिलं आहे.
हे वाचा - टॉयलेटमधूनही पसरतोय कोरोना? संसर्ग रोखण्यासाठी क्रू मेंबर्सनी वापरला 'हा' पर्याय
या कोरोना लशीचं क्लिनिकल ट्रायल थांबवलं आहे. जर देशात लशीकरणात या लसीचा वापर झाला असता तर तर मोठ्या संख्येनं लोकांना एचआयव्ही संक्रमण झाल्याचं समोर आलं असतं आणि नागरिकांच्या आरोग्यावर याचा गंभीर परिणाम झाला असता, असं कंपनीनं सांगितलं. ऑस्ट्रेलियानं 5.1 कोटी डोस खरेदी करण्यासाठी चार लस उत्पादक कंपन्यांशी करार केला आहे. त्यापैकीच सीएसएल ही एक कंपनी आहे.
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी सांगितलं, कोरोना लसीचा दुष्परिणाम दिसतातच तात्काळ ट्रायल रोखणं याचा अर्थ सरकार आणि उत्पादक कंपन्या खूप सावधपूर्वक काम करत आहेत. ट्रायल रोखल्यानं त्याचं आश्चर्य नाही. कोणतीही घाई न करता सावधपूर्वक पुढे जायला हवं.