कॅनबेरा, 02 ऑक्टोबर : लहान मुलांना त्यांचे पालक (Parents) नवनवीन गिफ्ट्स (Gifts) देतंच असता. फक्त बर्थ डे, सणांच्या दिवशीच नाही तर मुलांनी (Kids) काही चांगलं काम केलं तर त्यांना अधिक प्रोत्साहित करण्यासाठीही पालक गिफ्ट देतात. ऑस्ट्रेलियातील एक आई मात्र याच्याही पुढे गेली आहे. ती आपल्या मुलांना गिफ्ट देते पण ते अगदी शे, हजार रुपयांचे नाही. तर लाखो-करोडे रुपयांचे असतात. तिच्या मुलांनाही आता महागड्या गिफ्ट्सची इतकी सवय झाली आहे की तिच्या मुलाने आता दुधाचा पहिला दात पडल्यानंतर भलतीच डिमांड केली आहे. ज्यामुळे महिलेलाही धक्का बसला आहे.
रॉक्सी (Roxy) नावाची ही महिला. 41 वर्षांची रॉक्सी खूप श्रीमंत आहे. ती पब्लिक रिलेशन कंपनी चालवते. तिला पीआर क्वीनही म्हटलं जातं. तिला 9 वर्षांची मुलगी पिक्सी आणि 7 वर्षांचा मुलगा हंटर अशी दोन मुलं आहेत. काही दिवसांपूर्वीच ही महिला आणि तिची मुली चर्चेत आली होती.
हे वाचा - काय म्हणावं याला! चक्क प्रेशर कुकरसोबतच केलं लग्न; 4 दिवसांतच घटस्फोट
या महिलेने आपल्या या दोन्ही मुलांना चक्कर 1.41 कोटी रुपयांची मर्सिडीज कार (Mercedes Benz car) गिफ्ट केली होती. गाडी चालवण्याचं या मुलांचं वय नाही तरी त्यांच्या आईने त्यांना असं गिफ्ट दिलं होतं. असे बरेच महागडे गिफ्ट्स ती आपल्या मुलांना देते. ज्यामुळे तिच्यावर सोशल मीडियावर टिकाही होते.
रॉक्सीच्या मुलांनाही आता अशा गिफ्ट्सची सवय झाली आहे. नुकतं हंटरचा दुधाचा दात तुटला. पाश्चिमात्य देशात मुलांचा दात तुटल्यानंतर टूथे फेअरी म्हणून त्यांना एक नाणं दिलं जातं. हंटरला त्याच्या आईने टूथ फेअरीकडून काय हवं आहे, हे विचारलं. तेव्हा त्याने चक्क 12 हजार रुपये मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली.
हे वाचा - हद्दच झाली! ऑपरेशनवेळी डोळ्यातून आलं पाणी; रुग्णालयाने रडण्याचेही वसूल केले पैसे
रॉक्सीन आपल्या मुलाच्या या मागणीचा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटवरही शेअर केला आहे. आपल्या मुलांना महागडे गिफ्ट देण्याची सवय लावल्यानेच हंटरने अशी मागणी केल्याची प्रतिक्रिया या व्हिडीओवर येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.