मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

फिल्मी कॅरेक्टर नाही प्रत्यक्षात आहे ही व्यक्ती; तुम्हाला विचित्र वाटणारं हे शरीर वरदानापेक्षा कमी नाही

फिल्मी कॅरेक्टर नाही प्रत्यक्षात आहे ही व्यक्ती; तुम्हाला विचित्र वाटणारं हे शरीर वरदानापेक्षा कमी नाही

या व्यक्तीला अशा विचित्र शरीराचा इतका फायदा आहे, ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल.

या व्यक्तीला अशा विचित्र शरीराचा इतका फायदा आहे, ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल.

या व्यक्तीला अशा विचित्र शरीराचा इतका फायदा आहे, ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल.

  • Published by:  Priya Lad
कॅनबेरा, 17 फेब्रुवारी : हा फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला एखाद्या फिल्ममधील कॅरेक्टर असावं असं वाटेल. पण ही व्यक्ती कोणत्या फिल्ममधील कॅरेक्टर नाही तर प्रत्यक्षात आहे. या व्यक्तीला विचित्र शरीरासह भारी ताकदही मिळाली आहे. या व्यक्तीकडे अशी क्षमता आहे, ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल (Man accident proof body). तसं माणसांची एक ठराविक शरीररचना असली तर त्यात काही ना काही वेगळेपण असतं. पण ऑस्ट्रेलियातील ग्राहमचं (Graham) शरीर फक्त वेगळं नाही तर विचित्र आहे. हे विचित्र शरीर पाहिल्यानंतर ते फाइबर ग्लास, सिलिकॉन आणि केसांपासून बनलेलं असावं असं वाटतं. पण खरंतर हे त्याला नैसर्गिकरित्या मिळालेलं शरीर आहे. सामान्य माणसांप्रमाणे त्याचं शरीर नाही. त्याच्या शरीरात वेगवेगळे फॉर्मेशन दिसतील. त्याचं डोकं खूप मोठं आहे, यात क्रम्पल झोन आहेत. त्याला मान नाही आणि नाक खूप आत आहे. त्याची छाती बॅरलसारखी आहे. एअरबॅग्जसारखा त्याचा आकार आहे. ज्याच्या आसपास फॅट टिश्यू जमा झाले आहेत. त्याचे हातपायही वेगवेगळ्या दिशेला आहेत. हे वाचा - OMG! हे कसं शक्य आहे? महिलेच्या चक्क काखेतून निघतं दूध या अशा शरीरामुळे ग्राहम विचित्र दिसत असला, सामान्य माणसांपेक्षा वेगळा दिसत असला तरी त्याच्या या अशा शरीराचा त्याला खूप मोठा फायदा आहे (Deformed man can survive car crash) . त्याची बॉडी म्हणजे अॅक्सिडंट प्रुफ बॉडी आहे. म्हणजे अपघातात त्याचा मृत्यू होऊ शकत नाही. कार अपघातातून वाचवण्याची  शक्यता खूप वाढते  (Man has perfect body to survive accident) . त्याच्या शरीराची रचना अशा पद्धतीने आहे, ज्यामुळे अपघातामुळे ज्या अवयवांना नुकसान पोहोचते, त्याला सुरक्षा कवच मिळतं.  द सनच्या रिपोर्टनुसार डॉक्टरांच्या मते, त्याचं डोकं हेल्मेटसारखं आहे, जे क्रॅशचा धक्का सहन करू शकतं. क्रम्पल झोन कारच्या खिडकीतून मिळणारा धक्का झेलू शकतो. नाक, गालावरील हाडं आणि कान टिश्यूमध्ये आहेत. त्यामुळे त्यांना दुखापत होण्याची शक्यता कमी होते. बॅरलसारखी छाती वेगामुळे होणाऱ्या अपघाताच्या धक्क्यातून वाचवू शकते. हे वाचा - आता अंध लोकांनाही जग दिसू शकणार! बायोनिक डोळ्यांवर शास्त्रज्ञांची चाचणी सुरू जगभरात दरवर्षी  1 लाख 65 हजारपेक्षा जास्त लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो. अपघातापासून सुरक्षा देतील अशा गाड्या आता तयार करण्यात आळ्या आहेत पण तरी अपघात होतात. अशात ग्राहमला अपघातापासून बचावणारा सुरक्षित अशी व्यक्ती म्हणता येईल. कदाचित ग्राहम जगातील एकमेव व्यक्ती असावी जिच्या शरीराची रचना अशी आहे की कार क्रॅशनंतरही तो जिवंत राहू शकेल.
First published:

Tags: Accident, Lifestyle

पुढील बातम्या