Home /News /lifestyle /

Aurangabad : फॅशन डिझायनिंगमध्ये करिअर करायचंय? MGM विद्यापीठातील कोर्स फक्त तुमच्यासाठीच : VIDEO

Aurangabad : फॅशन डिझायनिंगमध्ये करिअर करायचंय? MGM विद्यापीठातील कोर्स फक्त तुमच्यासाठीच : VIDEO

फॅशन

फॅशन डिझायनिंग कोर्स, औरंगाबाद

व्यावसायिक प्रशिक्षण घेतले की, नोकरी किंवा उद्योग उभे करण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे औरंगाबादमधील MGM University मधील Fashion Design Course पूर्ण केला तर, बड्या कंपन्यांमध्ये नोकऱ्यांची संधी आहे.

  औरंगाबाद, 16 जून : उच्च शिक्षण घेऊनदेखील अनेक क्षेत्रांमध्ये नोकऱ्या मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना खूप धडपडावं लागतं. परंतु, नोकरी मिळत नाही. पण, एखादा व्यावसायिक कोर्स केला की, नोकरी किंवा उद्योग उभा करण्याची संधी मिळते. जर तुम्हाला 'फॅशन डिझाइन' या क्षेत्रात आवड असेल आणि तुम्हाला या क्षेत्रात करिअर करायचं असेल तर तुम्हाला या क्षेत्रामध्ये स्वतःचा व्यवसाय करण्यासोबतच फॅशन डिझाइनिंगची (Fashion Design Course) जोडल्या गेलेल्या अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी करता येऊ शकते. यामुळे तुम्हाला या क्षेत्रात करिअर करायचं असेल तर तुम्ही MGM युनिव्हर्सिटीतील फॅशन डिझायनिंग या इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेऊन फॅशन क्षेत्रामध्ये आपलं करिअर घडवू शकता. (Aurangabad : Fashion Designing in MGM university) एमजीएम फॅशन डिझाइनिंग इन्स्टिट्यूटच्या प्रो. अंजली खोत म्हणाल्या, "फॅशन डिझायनिंग या क्षेत्रामध्ये नोकरी-व्यवसायाच्या प्रचंड संधी आहेत. यामुळे या क्षेत्रात करिअर करणाऱ्या मुला व मुलींच्या संख्या वाढत आहेत. फॅशन डिझायनिंग क्षेत्रात करिअर करायचे असेल, तर त्यासाठी या क्षेत्रातील माहिती आणि ज्ञान असणे आवश्यक आहे. यासाठी ज्या विद्यार्थ्यांना या क्षेत्रात करिअर करायचे त्यांनी या विद्यापीठातील फॅशन डिझायनिंग इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेऊ शकता किंवा इथून माहिती घेऊ शकता."

  गुगल मॅपवरून साभार...

  ...अशी आहे प्रवेश प्रक्रिया बीडीएस फॅशन डिझाईन, टेक्स्टाइल डिझाइन, फॅशन डिझाईन, अशी कोर्सेसची नावं आहेत. 4 वर्षांचा कालावधी या कोर्ससाठी आहे. प्रत्येक वर्षी 1 लाख अशी या कोर्सेसची फी आहे, म्हणजेच 4 लाख रुपये हा कोर्स पूर्ण करण्यासाठी लागतात. या कोर्ससाठी प्रवेश घेण्यासाठी https://mgmu.ac.in/ या वेबसाईटवर ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करू शकता. एमजीएम इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन डिझाईन, एमजीएम युनिव्हर्सिटी, एन-6, सिडको, औरंगाबाद, महाराष्ट्र 431005 हा त्याचा पत्ता आहे. चौकशीसाठी 7972988179 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करू शकता. वाचा : Aurangabad : फोटोग्राफीत जबरदस्त संधी! MGM विद्यापीठातील Photography कोर्स तुुमच्यासाठीच कुठे नोकरी मिळू शकते? या कोर्ससाठी बारावी ओरिजनल मार्कशीट, डीसी, आधार कार्ड दोन झेरॉक्स, दोन पासपोर्ट फोटो, असणे आवश्यक आहेत. एकूण 60 विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. प्रवेश घेण्यासाठी 30 जुलै ही शेवटची तारीख आहे. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर शाॅपर्स स्टाॅप, काॅटन किंग, राॅयल टेस्ट, यासारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये तुम्हाला नोकरी लागू शकते. कारण, या इन्स्टिट्यूटचा या कंपन्यांबरोबर टायप झालेला आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना स्वतःचा व्यवसाय करता उभा करता येऊ शकतो.
  First published:

  Tags: Career

  पुढील बातम्या