मुंबई, 14 जून : प्रत्येक दिवस सारखा नसतो. येणाऱ्या दिवसातील समस्यांची चाहूल आधीच लागली तर सामना कऱणं सोपं असतं. त्यासाठी आपल्याला आजचा दिवस कसा असेल हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
मेष - आजचा आपला दिवस धावपळीत जाणार आहे. अतिमैत्रिपूर्ण वागणाऱ्यांपासून दोन हात लांब राहा.
वृषभ- क्षमतेपेक्षा अति काम करणं आपल्यासाठी आज त्रासदायी ठरू शकतं. कौटुंबिक तणावामुळे मानसिक शांतता भंग होईल.
मिथुन- आपल्याला असणाऱ्या समस्या मोठ्या असल्या तरी आजूबाजूच्या लोकांना त्या कळणार नाहीत. प्रिय व्यक्ती, पार्टनरसोबत वाद होतील.
कर्क- भागीदारी व्यवसाय आणि आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करू नका. आजचा दिवस चांगला आहे. त्यामुळे आपली सगळी कामं आटपून घ्या.
सिंह - कामाचा ताण जास्त असला तरीही आपलं आरोग्य चांगलं राहिल. आपल्या लोकांना समजण्यात कमी पडाल. प्रेमाच्या बाबतील पार्टनरवर दबाव आणू नका.
कन्या- आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. जोडीदाराला देण्यासाठी आपल्याकडे आज पुरेसा वेळ आहे.
तुळ- आज आपल्याला चांगली बातमी मिळेल. खर्चावर वेळीच नियंत्रण ठेवा. त्वरीत समस्यांचा सामना करण्याची आपली क्षमता आपल्याला विशेष ओळख देईल.
वृश्चिक- आपले विचार सकारात्मक ठेवा. मनातील भीतीसमोर कमजोर पडू नका. प्रेमाच्या बाबतीत आज विशेष काळजी घ्या.
धनु- पुरेशी विश्रांती घेणं आवश्यक आहे. ऐकलेल्या गोष्टींवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका आणि त्यांच्या सत्याची कसून परीक्षा घ्या.
मकर- आधी केलेली गुंतवणूक आज आपल्या फायद्याची ठरेल. प्रिय व्यक्तीला विश्वासात घेऊन सगळ्या गोष्टी सांगा. नवीन संधी मिळतील.
कुंभ- नकारात्मक वृत्तीमुळे प्रगतीमध्ये अडथळा निर्माण होईल.
मीन- प्रिय व्यक्तीची आठवण येईल. वैवाहिक जीवनासाठी आजचा दिवस चांगला असेल.
संपादन- क्रांती कानेटकर
Published by:Kranti Kanetkar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.