Home /News /lifestyle /

राशीभविष्य : कर्क आणि मकर राशीच्या व्यक्तींनी आज खर्चावर नियंत्रण ठेवा

राशीभविष्य : कर्क आणि मकर राशीच्या व्यक्तींनी आज खर्चावर नियंत्रण ठेवा

कोणत्या राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस असेल फायद्याचा जाणून घ्या 10 जूनचं राशीभविष्य.

    मुंबई, 10 जून : प्रत्येक दिवस सारखा नसतो. आपल्या राशीतील ग्रहांच्या बदलत्या स्थितीचा परिणाम दिवसावर होत असतो. येणाऱ्या दिवसातील समस्यांची पूर्वकल्पना असेल तर त्यांचा सामना करण अधिक सोपं जातं. यासाठी जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस मेष - कौटुंबिक जबाबदारी वाढेल. अनावश्यक खर्च टाळा. भावना व्यक्त करणं कठीण जाईल. वेळ वाया घालावू नका. वृषभ- प्रवास ताण आणि थकवा देणारा असेल. आर्थिक फायदा होईल. आळस झटकून आपली राहिलेली कामं पूर्ण करा. मिथुन- आरोग्य चांगलं राहिल. गुंतवणुकीमुळे तुमची भरभराट होईल. प्रिय व्यक्तीचं प्रेम मिळेल. जीवनसाथीची कोणतीही गोष्ट गंभीरपणे न घेतल्यास वाद होऊ शकतो. कर्क- गुंतवणूक कऱण्यासाठी आजचा दिवस चांगला नाही. प्रेम आणि वेळ आपल्या आयुष्यात दोन्ही महत्त्वाचे आहे. कोणत्याही जुन्या वाईट घटकाचा उल्लेख करण्यास टाशकतोळा, अन्यथा यामुळे वातावरणात तणाव निर्माण होऊ . सिंह - इच्छेनुसार गोष्टी होणार नाहीत पण धीर सोडू नका. वैवाहिक जीवनात आजचा दिवस प्रेमाचा असू शकतो. समस्यांवर आजचं तोडगा काढणं महत्त्वाचं ठरेल. कन्या- रस्ता ओलांडताना आणि वाहन चालवताना काळजी घ्या. अपेक्षेनुसार गोष्टी न घडल्यास निराश होऊ नका. वैवाहिक जीवनात तणावाचं वातावरण निर्माण होईल. तुळ- द्वेषामुळे आपलं नुकसान होऊ शकतं. अचानक मिळालेल्या नफ्यानं आर्थिक सुधारणा होईल. शासकीय कामं, मोठे व्यवहार करण्यासाठी आजचा दिवस चांगला नाही. वैवाहिक जीवनासाठी आजचा दिवस शुभ आहे. वृश्चिक- आपल्या वागण्यामुळे संभ्रम निर्माण होऊ शकतो. हवी तशी परिस्थिती निर्माण न झाल्यानं आपला मूड बिघडू शकतो. मित्रांसोबत वेळ घालवा. धनु- आरोग्याची काळजी घ्या आणि गोष्टी व्यवस्थित करा. बोलताना आणि आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. प्रेम प्रकरणांमधील अडथळे दूर होतील. मकर- खर्चावर नियंत्रण ठेवा. अडचणींच्या प्रसंगात कुटुंबाकडून सल्ला आणि मदत मिळेल. प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवणं आवश्यक आहे. नकारात्मक विचारांवर नियंत्रण ठेवा. कुंभ- पोटाच्या समस्या आज पुन्हा उद्भवतील. जुन्या आठवणींना आज उजाळा मिळेल. पार्टनरसोबत वाद झाल्यानं आपल्या नात्यात दुरावा वाढेल. तणावाचं वातावरण असल्यानं चिडचिड होऊ शकते. मीन- आपली गुंतवणूक आणि भविष्यातील योजना गुप्त ठेवा. आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या भावना दुखावू नयेत म्हणून रागावर नियंत्रण ठेवा. बोलण्याआधी विचार करणं जास्त गरजेचं आहे. हे वाचा-आता सॅनिटायझरप्रमाणे Mouthwash देखील कोरोनाव्हायरसपासून करणार बचाव हे वाचा- आईच्या उपचारासाठीही नाहीत पैसे; अभिनेत्रीने चाहत्यांसमोर पसरले हात संपादन- क्रांती कानेटकर
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Astrology and horoscope, राशीभविष्य

    पुढील बातम्या