राशीभविष्य : मेष आणि कन्या राशीच्या व्यक्तींना आज करावा लागेल समस्यांचा सामना

राशीभविष्य : मेष आणि कन्या राशीच्या व्यक्तींना आज करावा लागेल समस्यांचा सामना

प्रत्येक दिवस सारखा नसतो. आपल्या राशीतील बदलत्या ग्रहांच्या स्थितीचा परिणाम आपल्यावर होत असतो.

  • Share this:

मुंबई, 17 मे : प्रत्येक दिवस सारखा नसतो. आपल्या राशीतील बदलत्या ग्रहाच्या स्थितीचा परिणाम आपल्यावर होत असतो. दिवसातील येणारी आव्हानं कोणती याची पूर्वकल्पना आपल्याला असेल तर त्यांचा सामना करणं अधिक सोपं जातं. त्यासाठीच जाणून घ्या कसा असेल 15 मेचा दिवस कसा असेल.

मेष - आपल्याला आलेल्या ताणतणावामुळे आपली चिडचिड होऊ शकते. भविष्यातील योजना गुप्त ठेवा. प्रिय व्यक्ती सोबत नसल्याची जाणीव त्रासदायक असेल. मेहनत करा.

वृषभ- आज आपला आत्मविश्वास वाढल्यानं काम सुरळीत पार पडेल. पुरेशी विश्रांती घ्या. गुंतवणूक करण्याआधी माहिती घेणं महत्त्वाचं आहे. आज आपल्याला नवीन संधी मिळतील.

मिथुन- भविष्यातील चिंतेमुळे आपण अस्वस्थ असाल. चुकीच्या आणि अनावश्यक गोष्टींपासून स्वत:ला दूर ठेवा. जोडीदारासोबत आज आपले वाद होतील.

कर्क- समस्यांचा सामना करावा लागेल. केलेली गुंतवणूक लाभदायी ठरेल. आजचा दिवस थोडा सुस्त आणि बिनधास्त असेल.

सिंह - आज आपल्याला अस्वस्थ वाटेल ज्यामुळे मानसिक शांतता भंग होईल. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत मिळतील.

हे वाचा-Success story: कोचिंग क्लास न करता जिद्दीच्या जोरावर नर्स झाली IAS

कन्या- आज स्वत:ला उत्साही ठेवण्याचा प्रयत्न करा. तणावाचा सामना करावा लागेल. कुटुंबीयांना जास्त वेळ द्या. मोठे व्यवहार करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.

तुळ- स्वत:वर उपचार करणं धोक्याचं ठरेल. अचानक आलेल्या समस्यांमुळे शांतता भंग होईल. आर्थिक प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करा. अफवांपासून दूर राहा.

वृश्चिक- आपल्या आयुष्यातील प्रत्येक तास महत्त्वाचा आहे त्यामुळे वेळ वाया घालवू नका. जीभेवर नियंत्रण ठेवा.

धनु- आर्थिक परिस्थिती सुधारण्यास बांधील आहे. चुकीच्या मार्गावर जाणार नाही याची काळजी घ्या. पुस्तक वाचणं फायद्याचं ठरेल.

मकर- भांडण्याऐवजी आपलं म्हणणं शांतपणे मांडा. आरोग्याची काळजी घ्या.

कुंभ- भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. आजचा दिवस आपल्याला अडथळ्यांचा सामना करावा लागेल.

मीन- आर्थिक व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा. जोडीदाराचे प्रेम मिळेल. अवास्तव धोका पत्करणं टाळा.

हे वाचा-वडील करायचे सिक्युरिटी गार्डची नोकरी, UPSC मध्ये मुलानं मिळवलं अव्वल यश

First published: May 17, 2020, 8:16 AM IST

ताज्या बातम्या