मुंबई, 12 जून : प्रत्येक दिवस सारखा नसतो. आपल्या राशीतील बदलत्या ग्रहांच्या स्थितीचा परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर होत असतो. दिवसभरात येणाऱ्या समस्या कोणत्या याची पूर्वकल्पना मिळाली तर त्यावर तोडगा काढणं सोपं होतं. यासाठीच जाणून घ्या कसा असेल आजचा आपला दिवस.
मेष - अचानक वाढलेल्या खर्चामुळे बजेट बिघडू शकतं. प्रिय व्यक्तीची भेट होण्याची शक्यता आहे.
वृषभ- दुसऱ्यांवर टीका करण्याच्या वृत्तीमुळे आज आपल्याला टीकेचा सामना करावा लागेल. घाईनं निर्णय घेऊ नका. जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळेल.
मिथुन- आपल्या स्वार्थी वागण्यामुळे त्रास होऊ शकतो. प्रेमातील अडथळे दूर होण्याची शक्यता आहे. आपल्याकडे असलेल्या आत्मविश्वासाचा फायदा घ्या.
कर्क- वादविवादामुळे तुमची मनःस्थिती खराब करू शकतात. रागावर नियंत्रण ठेवा वादविवाद टाळा.
सिंह - आज आपल्यावर कामाचा ताण जास्त असेल. आपल्या प्रिय व्यक्तीला योग्य प्रकारे वागणूक द्या. आपल्या इच्छेप्रमाणे गोष्टी घडतीलच असं नाही.
कन्या- डोळ्यांचा आजार असणाऱ्यांना विशेष काळजी घ्या. आपल्या आक्रमक स्वभावावर नियंत्रण ठेवा.
तुळ- खर्चावर वेळीच आवर घातला नाही तर आर्थिक समस्यांचा सामना करावा लागेल. कामाच्या ठिकाणी प्रगती करायची असेल तर नवीन गोष्टी शिकणं महत्त्वाचं आहे.
वृश्चिक- आरोग्याची विशेष काळजी घ्या. गुंतवणूक करताना योग्य माहिती आणि सल्ला घेऊन करा. खोटं बोलण्यानं प्रेमात अडथळा निर्माण होईल.
धनु- कोणताही निर्णय, योजना किंवा काम करण्याआधी त्याच्या परिणामांचा विचार करा. कामाच्या ठिकाणी सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. आळस माणसाचा शत्रू आहे त्यामुळे तो झटकून कामाला लागा.
मकर- आज आपण अति उत्साही असाल. आज सकारात्मक बदल घडत असल्याचं पाहायला मिळेल. सर्जनशीलता आणि उत्साह तुम्हाला दुसर्या फायद्याच्या दिवसाकडे घेऊन जाईल.
कुंभ- गुंतवणूक करताना काळजी घ्या.फोनवर मित्रांशी संवाद साधल्यानं आनंद मिळेल.
मीन- दिवसभर व्यस्त असूनही आपण पुन्हा उर्जा आणि ताजेपणा प्राप्त करू शकाल. आर्थिक समस्यांमुळे आपल्याला काही सुचेनासं झालं आहे.
हे वाचा-महिलेनं बनवला असा HOT TEA; व्हिडीओ पाहून लोकांचं डोकं तापलं ना राव!
हे वाचा- First Aid : त्वचा भाजल्यावर सर्वात आधी काय करावं?
संकलन, संपादन- क्रांती कानेटकर
Published by:Kranti Kanetkar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.