राशीभविष्य: कन्या आणि वृश्चिक राशीच्या व्यक्तींना प्रेमात मिळू शकते निराशा

राशीभविष्य: कन्या आणि वृश्चिक राशीच्या व्यक्तींना प्रेमात मिळू शकते निराशा

कोणाचे स्टार्स चमकणार आणि कोणाला करावा लागणार आव्हानांचा सामना वाचा आजचं राशीभविष्य.

  • Share this:

मुंबई, 05 जून : प्रत्येक दिवस सारखा नसतो. आपल्या राशीतील ग्रहांच्या बदलत्या स्थितीचा परिणाम दिवसावर होत असतो. येणाऱ्या दिवसातील समस्यांची पूर्वकल्पना असेल तर त्यांचा सामना करण अधिक सोपं जातं. यासाठी जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

मेष - खाण्या-पिण्याची विशेष काळजी घ्या. सतत मस्करी कऱण्याच्या वृत्तीवर नियंत्रण ठेवा.

वृषभ- दीर्घ काळापासून सुरू असणाऱ्या आजारापासून आज आपल्याला आराम मिळेल. प्रिय व्यक्तीची कमतरता जाणवेल.

मिथुन- इतरांवर सतत टीका करण्याच्या आपल्या वृत्तीमुळे आज आपल्याला त्रास होईल. खर्चात अचानक वाढ होईल. व्यायाम आणि योग केल्यास आराम मिळेल.

कर्क- आज आपल्याला अनेक मतभेदांचा सामना करावा लागेल. आज केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. घाईनं कोणताही निर्णय घेऊ नका.

सिंह -पुरेशी विश्रांती घ्या.स्वप्न पाहाणं वाईट नाही मात्र त्या दिशेनं वाटचाल करा.

कन्या- वृद्ध व्यक्तींनी त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. प्रेम प्रकरणांमध्ये आजचा दिवस वादविवादाचा असू शकतो. निर्णय घेण्याआधी ज्येष्ठांचा सल्ला घ्या.

तुळ- गुंतवणुकीचे निर्णय घाईत घेऊ नका. कोणतंही वचन देण्याआधी त्याचा विचार करा. जोडीदारासोबत वेळ घालवणं आनंद देणारं असेल.

वृश्चिक- प्रेमात आज आपल्या पदरी निराशा येईल. भागीदारी व्यवसाय टाळा. नवीन जोखीम किंवा आज नवीन योजना तयार करू नका. वैवाहिक जीवनात आजचा दिवस खूप चांगला असेल.

धनु- गुंतवणूक फायद्याची आहे. कुटुंबीयांसोबत आज वेळ घालवा आणि आराम करा. जोडीदाराप्रती प्रेम व्यक्त कराल.

मकर- आज आपलं मन स्थिर नसेल. प्रिय व्यक्तीच्या वागण्याचा आज त्रास होऊ शकतो. लोकांसोबत संवाद साधताना सावधगिरी बाळगा.

कुंभ- आजचा दिवस आपल्यासाठी शुभ आहे. घाईनं गुंतवणूक करू नका. वादविदापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा.

मीन- आरोग्याकडे थोडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. अचानक अनपेक्षित खर्च आपल्यावर आर्थिक भार टाकू शकतात.

संपादन- क्रांती कानेटकर

First published: June 5, 2020, 8:30 AM IST

ताज्या बातम्या