Home /News /lifestyle /

राशीभविष्य: तुळ आणि मीन राशीच्या व्यक्तींना आज वाद-विवादाचा सामना करावा लागेल

राशीभविष्य: तुळ आणि मीन राशीच्या व्यक्तींना आज वाद-विवादाचा सामना करावा लागेल

कसा असेल आजचा दिवस जाणून घ्या 7 मेचं राशीभविष्य.

    मुंबई, 07 मे : प्रत्येक दिवस सारखा नसतो. आपल्या राशीतील बदलत्या ग्रहांचा परिणाम आपल्या दिवसावर होत असतो. आजचा दिवस शुभ असला तरी प्रत्येक राशीसाठी तो कसा असेल जाणून घ्या. मेष - अचानक खर्च आल्यानं आपलं बजेट बिघडेल. भागीदारीमध्ये पैसे गुंतवण्याआधी सल्ला घ्या. वृषभ- घाईत निर्णय घेतल्यानं पश्चाताप करावा लागेल. कलाकार आणि लेखन यासारख्या कामांमध्ये आज आपला दिवस चांगला जाईल. गुंतवणूक करताना सल्ला घ्या. मिथुन- प्रेमात खूप ताकद आहे. ही ऊर्जा आपल्याला जगण्याचा आनंद देईल. वाटत पाहात बसण्यापेक्षा संधी शोधा. आपलं काम आणि बोलणं दोन्ही परफेक्ट असावं याकडे लक्ष द्या. कर्क- काय चांगलं काय वाईट याचा आपणच विचार केला पाहिजे. आर्थिक स्थिती सुधारेल. कोणताही निर्णय घेताना घाई करू नका. सिंह - दीर्घ काळापासून असलेल्या आजारापासून सुटका होईल. गुंतवणुकीसाठी आजचा दिवस चांगला आहे. प्रिय व्यक्तींच्या प्रकृतीची विशेष काळजी घ्या. वेळेत कामं पूर्ण करण्याकडे लक्ष केंद्रीत करा. हे वाचा-इम्युनिटी ते ब्युटीसाठी फायदेशीर आहे Vitamin C कन्या- कामाचा ताण वाढल्यानं मानसिक त्राण होईल. कोणतीही गुंतवणूक कऱण्याआधी दोन वेळा विचार करा. दीर्घ काळापासून येणाऱ्या समस्यांवर आज तोडगा मिळेल. आळस झटकून टाका आणि उत्साहानं काम करा. तुळ- मित्र आणि आप्तेष्टांसोबत संपर्क साधाल. नाराजीतून आज समस्या ओढवून घेऊ नका. कामाचा ताण असेल दिवसा थकवा जाणवेल. प्रत्येक गोष्ट आज आपल्याला भांडून मिळवावी लागू शकते. वृश्चिक- शारीरिक आणि मानसिक दोन्ही आजार होण्याचं कारण आपल्याला आलेला ताण असू शकतं. प्रेमामुळे आपल्याला झोप लागणार नाही. पार्टनरसोबत वेळ चांगला जाईल. धनु- आजचा दिवस आपल्यासाठी फायदेशीर नाही. तणाव आल्यानं आपली एकग्रता भंग होऊ शकते. बॉसच्या वागण्यामुळे आजचा दिवस वाईट जाऊ शकतो. कुटुंबियांसोबत वेळ घालवा. मकर- गुंतवणूक करण्यापूर्वी काळजी घ्या. आपले छंद जोपासण आणि मनोरंजनासाठी वेळ द्या. आज आपल्यासाठी प्रत्येक मिनिट महत्त्वाचा आहे. वेळ वाया घालवू नका. कुंभ- शत्रूंपासून सावध राहा. आर्थिक व्यवहार करताना आणि बोलताना सावधगिरी बाळगा. गुंतवणूक आपल्याला फायद्याची ठरेल. सहकारी, कुटुंबीय आणि प्रिय व्यक्तीला चांगल्या गोष्टींसाठी प्रोत्साहित करा. मीन- आत्मविश्वास वाढल्यानं त्याचा फायदा प्रगतीसाठी होईल. आर्थिक अडचणी आणि वाद-विवादाचा सामना करावा लागेल. नवीन प्रकल्प आव्हानं स्वीकारण्याआधी त्याचा विचार करा. हे वाचा-एक सोनार झाला भाजीवाला, 25 वर्ष दागिन्यांनी सजलेल्या दुकानात लागले कांदे, बटाटे संपादन- क्रांती कानेटकर
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Astrology and horoscope, राशीभविष्य

    पुढील बातम्या