राशीभविष्य : वृषभ आणि मीन राशीच्या व्यक्तींनी आज घाईत निर्णय घेण धोकादायक

राशीभविष्य : वृषभ आणि मीन राशीच्या व्यक्तींनी आज घाईत निर्णय घेण धोकादायक

कसा असेल आजचा आपला दिवस जाणून घ्या 30 जूनचं राशीभविष्य.

  • Share this:

मुंबई, 30 जून: प्रत्येक दिवस सारखा नसतो. आपल्या राशीतील बदलत्या स्थितीचा परिणाम आपल्या दिवसावर होत असतो. येणाऱ्या संकटांची चाहूल आपल्याला लागली तर समस्या सोडवणं अधिक सोपं होतं यासाठीच जाणून घ्या 12 राशींसाठी कसा असेल आजचा दिवस.

मेष- आज विश्रांती घ्या. कोणत्याही गोष्टीवर आपली त्वरीत प्रतिक्रिया देऊ नका. हा दिवस खरोखर थोडा कठीण आहे.

वृषभ- गुंतवणुकीतून फायदा होईल. घाईघाईने निर्णय घेणे शहाणपणाचे नाही. मनोरंजनासाठी फिरणे समाधानकारक असेल.

मिथुन- रस्त्यावरून जाताना सावधगिरी बाळगा. दुसऱ्यांच्या चुकांचा त्रास तुम्हाला सहन करावा लागेल. आर्थिक व्यवहार करीत आहात याबद्दल सावधगिरी बाळगा. तुमच्या आयुष्यात खूप मोठे बदल घडू शकतात.

कर्क- कुटुंबाकडून आपल्याला खूप अपेक्षा असतील.कुटुंबातील सदस्य आज आपल्यावर रागवू शकतात. जोडीदारासोबत वेळ घालवा.

हे वाचा-सौंदर्यात अभिनेत्रींशी बरोबरी करणाऱ्या या TikTok स्टार्सना म्हणावं लागेल अलविदा

सिंह- खर्चात अनपेक्षित वाढ झाल्याने तुमची मानसिक शांती भंग होईल. टुंबासमवेत एक महत्त्वपूर्ण निर्णय निश्चित केला जाऊ शकतो. आजचे निर्णय भविष्याच्या दृष्टीनं फायद्याचे ठरतील.

कन्या- प्रेमासाठी आजचा दिवस खूप चांगला असेल. आज निर्णय घेताना सल्ला घ्या. प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवा.

तुळ- द्विधा मनस्थिती आपल्याला गोंधळात टाकणारी असेल. आप्तेष्ट, मित्रांसोबत आज संवाद साधाल. जोडीदारामुळे तुम्हाला मानसिक त्रास होऊ शकतो.

हे वाचा-धक्कादायक VIDEO आला समोर! TikTok असा चोरतो तुमचा डेटा

वृश्चिक- चिंता केल्यानं आज मानसिक स्वास्थ खराब होऊ शकतं. चांगल्या परिणामांसाठी स्वत:ला प्रोत्साहित करा. जोडीदारासोबत वाद होऊ शकतात.

धनु- गुंतवणूक फायद्याची ठरेल. घरात मुलाच्या किंवा वृद्ध व्यक्तीच्या आरोग्याशी संबंधित समस्या ओढवू शकते

मकर - कामाचा ताण असला तरीही आपलं आरोग्य चांगलं राहिल. गुंतवणुकीच्या नव्या संधी येतील. काम अथवा व्यवसायाच्या क्षमता वाढवून नव्या संधी मिळवाल.

कुंभ- खर्चावर नियंत्रण राखा. आपल्या कुटुंबाच्या भल्याचा विचार करा. आपल्या कृतीमागे द्वेष नाही तर प्रेमाची भावना असेल याची काळजी घ्या. आपण बरेच सकारात्मक बदल घडवू शकता.

मीन- आपल्या आनंदासाठी कुटुंबाचा त्याग करावा लागले. गुंतवणूक करताना खबरदारी घ्या. घाईनं कोणताही निर्णय घेऊ नका.

संपादन- क्रांती कानेटकर

First published: June 30, 2020, 7:06 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading