मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

राशीभविष्य : वृषभ आणि तुळ राशीच्या व्यक्तींना आज नवीन संधी, यश मिळेल

राशीभविष्य : वृषभ आणि तुळ राशीच्या व्यक्तींना आज नवीन संधी, यश मिळेल

कसा असेल आपला दिवस जाणून घ्या 03 मेचं राशीभविष्य

कसा असेल आपला दिवस जाणून घ्या 03 मेचं राशीभविष्य

कसा असेल आपला दिवस जाणून घ्या 03 मेचं राशीभविष्य

  • Published by:  Kranti Kanetkar
मुंबई, 03 मे: प्रत्येक दिवस सारखा नसतो. राशीतील ग्रहाच्या बदलत्या स्थितीचा परिणाम आपल्या दिवसावर होत असतो. येणाऱ्या संकटांची चाहूल आधीच लागली तर त्यांचा सामना करणं आधीक सोपं होतं त्यासाठीच जाणून घ्या कसा असेल 03 मेचा दिवस. मेष- तुमचे आरोग्य निरोगी राहील. आर्थिक अडचणी टाळण्यासाठी बजेट निश्चित करा. आपल्या जोडीदारासमवेत हा एक चांगला दिवस असेल. वृषभ- वेगवान कार्य आपल्याला प्रेरणा देईल. यश मिळविण्यासाठी आपले विचार वेळोवेळी बदला. नवीन गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. आपल्या प्रेमाचा मार्ग एक सुंदर वळण घेऊ शकतो. मिथुन- आपल्या क्षेत्रात प्रगती कराल. जोडीदाराच्या मदतीने आपण सहजपणे जीवनातील अडचणींचा सामना करू शकता. कर्क- स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्या. जमीन, रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक किंवा लक्ष केंद्रीत करा. प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवल्यानं आनंद मिळेल. सिंह - हुशारीनं गुंतवणूक करा. वचनात अडकू नका त्यामुळे नुकसान होऊ शकते. जोडीदारासोबत वेळ घालवा. हे वाचा-वारंवार धुतल्याने हात झाले ड्राय, घरगुती उपायांनी पुन्हा होतील सॉफ्ट सॉफ्ट कन्या- कामाचा ताण आपल्या मनावर येऊ शकतो ज्यामुळे आपण कुटुंब आणि मित्रांसाठी वेळ काढू शकणार नाही. प्रेम हे नेहमीच जिव्हाळ्याचे असते आणि आज आपण अनुभवाल. तुळ- खर्चात वाढ होईल. प्रेम प्रकरणांमध्ये नवीन दिशा मिळेल. मार्केटिंगमध्ये जाण्याचा विचार असेल तर नक्की प्रयत्न करा. वृश्चिक- आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगणं महत्त्वाचं आहे. घाईत निर्णय घेऊ नका. वेळ वाया घालवू नका. धनु- पार्टनरचा मूड चांगला नसल्यानं तुमच्यावर परिणाम होईल. आजचा दिवस थोडा त्रासदायी असू शकतो. शांत मन ठेवलं तर अडचणींवर मात करू शकता. मकर- गुंतवणूक फायद्याची ठरेल. कोणत्याही गोष्टीत सल्ला महत्त्वाचा आहे. घरगुती जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करू नका. कुंभ- केवळ विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. त्या दिशेनं पावलं उचलायला सुरुवात करा. अडचणींचा सामना करावा लागेल. मीन- आर्थिक परिस्थिती सुधारेल. सहकाऱ्यांसोबत कामाच्या कारणांवरून वाद होतील. जोडीदाराच्या चिडचिडेपणाला तुम्ही जबाबदार असाल. हे वाचा-ऐकावं ते नवल! गर्भनिरोधक म्हणून वापरलं जात होतं टॉयलेट क्लीनर? संपादन- क्रांती कानेटकर
First published:

Tags: Astrology and horoscope, राशिभविष्य

पुढील बातम्या