Home /News /lifestyle /

राशीभविष्य : कन्या आणि वृश्चिक राशीला पार्टनरच्या वागण्याने उद्भवेल समस्या

राशीभविष्य : कन्या आणि वृश्चिक राशीला पार्टनरच्या वागण्याने उद्भवेल समस्या

कोणाचे स्टार्स चमकणार कोणाला करावा लागणार समस्यांचा सामना जाणून घ्या आजचं राशीभविष्य.

    मुंबई, 24 जून : प्रत्येक दिवस सारखा नसतो. आपल्या राशीतील ग्रहांच्या स्थितीचा परिणाम आपल्या दिवसावर होत असतो. दिवसभरात येणाऱ्या संकटांची चाहूल आपल्याला लागली तर त्यावर तोडगा काढणं अधिक सोपं होतं. त्यासाठी जाणून घ्या कसा असेल आपला आजचा दिवस. मेष- आरोग्याची समस्या उद्भवू शकते. दीर्घकालीन गुंतवणूक टाळा. एकमेकांना समजून घेऊन समस्या सोडवल्यास सोपं जाईल. आज कामाच्या ठिकाणी टीकेचे बळी पडू शकता. वृषभ- आज व्यवहार पूर्ण होतील आणि त्याचा फायदाही होईल. मित्र आणि कुटुंबीयांसोबत मतभेद उद्भवण्याची शक्यता आहे. ऐकलेल्या गोष्टींवर अंधळेपणानं विश्वास ठेवू नका. मिथुन- अति पैसे खर्च केल्यानं आपल्याला भविष्यात समस्येचा सामना करावा लागू शकतो. मनसिक ताण येईल, कुटुंबात समस्या उद्भवतील. हे वाचा-कोरोनाच्या साथीत पावसाळ्यात इतर आजारांचाही धोका; कसा कराल स्वत:चा बचाव कर्क- अतिरिक्त खर्च टाळा. न आवडणाऱ्या व्यक्तींशी भेट झाल्यानं दिवस रागात जाऊ शकतो. जोडीदारावरील प्रेमाची भावना वाढेल. सिंह- आज तुम्हाला थकवा जाणवेल आणि छोट्या छोट्या गोष्टींवर राग येऊ शकेल. अचानक नफा किंवा पैज देऊन आर्थिक स्थिती बळकट होईल. कन्या- आपलं वेगान होणारं कार्य आपल्याला प्रेरणा देईल. यश मिळविण्यासाठी आपले विचार वेळोवेळी बदला. प्रिय व्यक्तीमुळे त्रास होईल. तुळ- अस्वस्थतेची भावना तुम्हाला त्रास देऊ शकते. आपल्या प्रिय व्यक्तीचे आपल्यावर अपार प्रेम आहे. वैवाहिक जीवनात सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. आज आपल्याला महत्त्वाच्या विषयांवर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. वृश्चिक- आरोग्याच्या समस्यांपासून सुटका होईल. एकतर्फी प्रेमामुळे निराशा पदरी पडेल. कामाच्या ठिकाणी फायदा होईल. हे वाचा-OMG! शरीर की रबर? YOGA POSES पाहून तुम्हीही व्हाल थक्क धनु- आरोग्याच्या दृष्टीकोनातून आजचा दिवस चांगला नाही. खाण्याच्या बाबतीत सावधगिरी बाळगा. जोडीदारासोबत वाद झाल्यास जुन्या आठवणींना उजाळा द्या. मकर- आजल्या सभोवतालचे लोक आपल्याला सहकार्य करतील. कुंभ- जीवनाचा आनंद घेण्याच्या तयारीत असाल. दीर्घ काळासाठी केलेली गुंतवणूक फायद्याची ठरेल.प्रेमासाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. मीन- आरोग्य सुधारण्यासाठी आपल्याकडे पुरेसा वेळ आहे. ध्येयाच्या दृष्टीनं पावलं उचला. रागावर नियंत्रण ठेवा. मनोरंजन करण्यात आजचा दिवस जाईल. संपादन- क्रांती कानेटकर
    First published:

    Tags: Astrology and horoscope, Horoscope, राशीभविष्य

    पुढील बातम्या