मुंबई, 03 जुलै : प्रत्येक दिवस सारखा नसतो. येणाऱ्या प्रत्येक दिवसातील समस्यांची चाहूल आपल्याला आधीच लागली तर त्या सोडवणं अधिक सोपं जातं. यासाठीच जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस.
मेष- आरोग्य चांगलं राहिल. आजचा दिवस आपल्यासाठी खूप चांगला आहे.
वृषभ- आजचा दिवस आपल्यासाठी कंटाळवाणा असेल. कौटुंबिक समस्या जाणवतील. कायदेशीर सल्ला घ्या.
मिथुन- खराब मूडमुळे आपणास असे वाटू शकते की आपला जोडीदार तुम्हाला विनाकारण त्रास देत आहे.
कर्क- वाढते खर्च आपलं बजेट बिघडवू शकतात. आनंदाची बातमी मिळेल.
सिंह- थकवा जाणवेल आणि छोट्या छोट्या गोष्टींवर राग येऊ शकेल.
कन्या- चांगल्या गोष्टी केल्यानं आपल्याला आनंद मिळेल. व्यावसायिक समस्या सहजपणे सोडविण्यासाठी आपल्या कौशल्याचा वापर करा.
तुळ- अडचणींवर मात कराल. आज आपल्याला आरामाची गरज आहे.
वृश्चिक- आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, मद्यपान टाळा. आपण रोमँटिक विचार आणि स्वप्नांच्या जगात हरवाल.
हे वाचा-VIDEO: माज उतरवला! चिनी सैन्याच्या खतरनाक स्टंटला असं दिलं भारतीयांनी उत्तर
धनु- समस्यांमुळे मानसिक शांतता भंग होऊ शकते. आपल्याला क्षेत्रात नवीन आव्हानांचा सामना करावा लागेल.
मकर - पायर्या चढताना दम्याच्या रूग्णांनी काळजी घ्यावी. घाईत निर्णय घेणं महागात पडू शकतं.
कुंभ- कुटुंबासाठी आपण आपल्या आनंदाचा त्याग कराल. कुटुंबीयांकडून कोणतीच अपेक्षा आज बाळगू नये.
मीन- जोडीदारासोबत खूप वेळ घालवा. खर्च बजेट खराब करू शकतात आणि म्हणून बर्याच योजना मध्यभागी अडकतील.
संपादन- क्रांती कानेटकर