मुंबई, 02 जुलै : प्रत्येक दिवस सारखा नसतो. येणाऱ्या प्रत्येक दिवसातील समस्यांची चाहूल आपल्याला आधीच लागली तर त्या सोडवणं अधिक सोपं जातं. यासाठीच जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस.
मेष- आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करु नका.मोठे आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. वैवाहिक जीवन सुखकर करण्याचा प्रयत्न करा.
वृषभ- थोडा विश्रांती घ्या आणि रात्री उशीरापर्यंत काम करू नका. आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवा आणि आज खुल्या हाताने खर्च करणे टाळा. आज आपण प्रेमात पडू शकता.
मिथुन- कामाचा दबाव आपल्यावर असल्यानं आपली चिडचिड होईल. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी इतरांच्या गरजा समजून घेण्याचा प्रयत्न करा. जोडीदार तुमची खूप काळजी घेईल.
कर्क- मानसिक दबावामुळे आपल्याला खूप थकवा जाणवू शकतो. आरोग्य चांगलं राखण्यासाठी पुरेशी विश्रांती घ्या. वरिष्ठांच्या बोलण्याकडे लक्ष द्या.
हे वाचा-आता काय म्हणावं! गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी महापौरांनीच तोडला लॉकडाऊन
सिंह- नकारात्मक वृत्तीमुळे प्रगती करण्यात अडथळे येतील. अनपेक्षित खर्च आर्थिक भार टाकू शकतात.
कन्या- तणावाचा सामना करावा लागेल. आरोग्याच्या दृष्टीने धावणे आपल्यासाठी फायदेशीर ठरेल.
तुळ- खर्चामुळे आर्थिक भार वाढू शकतो. भविष्यासाठी पैसे जमा करावे, अन्यथा आपण अडचणीत येऊ शकता. प्रेमासाठी आजचा दिवस चांगला आहे.
वृश्चिक- आज शांत राहा. आर्थिक फायदा होईल. आपल्याला आज निर्णय घेऊन गोष्टींची योग्य निवड करावी लागेल.
हे वाचा-Tiktok वर बंदीनंतर धुळेकर स्टार उद्धवस्त; म्हणाला माझ्या दोन बायका ढसाढसा रडल्या
धनु- आपलं आरोग्य निरोगी राहिल. घरातील बदल आपल्याला खूप भावनिक बनवू शकतात.
मकर - आज आपण निराश होऊ शकता. प्रिय व्यक्तीची आठवण येईल.
कुंभ- आपल्या भावनांना बांधू नका आणि असे कार्य करा जे तुम्हाला शांती देईल. गुंतवणुकीतून उत्पन्नात वाढ होईल.
मीन- स्वत: ला शांत ठेवा कारण आज तुम्हाला अशा अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागेल, ज्यामुळे तुम्हाला खूप अडचणी येऊ शकतात.
संपादन- क्रांती कानेटकर