Home /News /lifestyle /

राशीभविष्य: वृषभ आणि सिंह राशीच्या व्यक्तींना अति उत्साह पडेल महागात

राशीभविष्य: वृषभ आणि सिंह राशीच्या व्यक्तींना अति उत्साह पडेल महागात

कोणाला करावा लागणार अडचणींचा सामना आणि कोणाला मिळणार आनंद वार्ता वाचा आजचं राशीभविष्य.

    मुंबई, 22 मे : प्रत्येक दिवस सारखा नसतो. आपल्या राशीतील बदलत्या ग्रहांच्या स्थितीचा परिणाम आपल्या दिवसावर होत असतो. समोर येणारी आव्हानं आणि चांगल्या घडामोडी याची पूर्वकल्पना असेल तर आपल्याला समस्यांचा सामना करणं अधिक सोपं जातं यासाठी जाणून घ्या कसा असेल आजचा आपला दिवस. मेष- सकारात्मक विचार करा. अचानक खर्च वाढल्यामुळे ताण येण्याची शक्यता आहे. आपल्या योजनांमध्ये आज सुधारणा कराव्या लागू शकतात. संयमानं कामं केली तर आजचा आपला दिवस चांगला जाऊ शकतो. वृषभ- मनातली भीती काढून टाकण्याचा प्रयत्न करा. तुम्ही चुकला असला तर पार्टनरला किंवा प्रिय व्यक्तीची माफी मागायला विसरू नका. निर्णय घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागेल. मिथुन- खर्चात वाढ झाली तरी उत्पन्नतील वाढ समतोल राखेल. लग्नाचा विचार करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. जोडीदारासोबत छान वेळ घालवाल. कर्क- धार्मिक कार्यात आणि चिंतन-मनन करण्यासाठी थोडा वेळ द्या. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या प्रगतीशील वाटचालीमध्ये अडथळे निर्माण होतील. संयम राखा आणि धीरानं घ्या. सिंह - प्रेमाच्या बाबतीत आज स्वत:वर नियंत्रण ठेवा. अति उत्साह आपल्यासाठी धोकादायक ठरेल. भागीदारीतून केलेली काम फायदा मिळवून देतील. हे वाचा-एका IRS अधिकाऱ्याची यशोगाथा! मागासलेल्या गावाचे स्मार्ट व्हिलेजमध्ये रुपांतर कन्या- छंद जोपासण्यावर भर द्या. मोठ्या योजना आणि कल्पनांद्वारे आपले लक्ष वेधले जाऊ शकते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी त्या व्यक्तीची कसून चौकशी करा. तुळ- नातेवाईकांमुळे थोडासा ताण येऊ शकतो. घाईन घेतलेला कोणताही निर्णय हानीकारक ठरू शकतो. रागावर नियंत्रण ठेवा. जोडीदाराच्या मदतीनं कठीण परिस्थितीवर मात कराल. वृश्चिक- कोणताही निर्णय घेण्याआधी चांगल्या आणि वाईट दोन्ही परिणामांचा विचार करा. वरिष्ठांच्या कठोर वागण्याचा आपल्याला त्रास होईल. विनाकारण आज आपल्या पार्टनरसोबत वाद होण्याची शक्यता आहे. धनु- दीर्घ काळासाठी गुंतवणूक करणं फायद्याचं ठरेल. प्रिय व्यक्तीसोबत किंवा पार्टनरसोबत वेळ घालवणं फायद्याचं ठरेल. सर्जनशील कल्पनांवर काम करायला सुरुवात करा. मकर- बऱ्याच काळापासून अडकलेले पैसे किंवा नुकसान भरपाई आपल्याला मिळेल. कामाच्या ठिकाणी आजचा आपला दिवस खूप चांगला जाईल. कुंभ- ताण आणि चिंता टाळा.विचार करून निर्णय घ्या आणि त्याची अंमलबजावणी करा. स्वप्न पाहाणं वाईट नाही पण त्यासाठी कठोर मेहनतही करायला हवी. मीन- कामात आज व्यस्त राहा. आपण केलेल्या गुंतवणुकीची माहिती तूर्तास कुणालाही देऊ नका. आजचा दिवस आपल्यासाठी खूप चांगला आहे. हे वाचा-कोरोनाच्या संकटात ही कंपनी देणार बोनस, 15000 फ्रेशर्संना नोकरीची ऑफर संपादन- क्रांती कानेटकर
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: राशीभविष्य

    पुढील बातम्या