राशीभविष्य : कर्क आणि मकर राशीच्या व्यक्तींना प्रेमात निर्माण होईल समस्या

राशीभविष्य : कर्क आणि मकर राशीच्या व्यक्तींना प्रेमात निर्माण होईल समस्या

कोणाचे स्टार्स चमकणार कोणाला करावा लागणार समस्यांचा सामना जाणून घ्या आजचं राशीभविष्य.

  • Share this:

मुंबई, 01 जून : प्रत्येक दिवस सारखा नसतो. येणाऱ्या दिवसातील समस्यांची चाहूल आधीच लागली तर सामना कऱणं सोपं असतं. त्यासाठी आपल्याला आजचा दिवस कसा असेल हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

मेष - परिस्थितीचा सामना करा. आपल्या प्रिय व्यक्तीला दुखवून नका. आजचा दिवस आपल्यासाठी थोडा कठीण आहे.

वृषभ- वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. दीर्घकालीन दृष्टीकोनातून शेअर्स आणि म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. चुकीच्या व्यक्तींपासून दूर राहा.

मिथुन- मन आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी प्रयत्न करा. कुटुंबाला सर्वाधिक वेळ द्या

कर्क- नवीन प्रकल्पात गुंतवणूक करण्यासाठी पैसे कमवू शकतात. आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर काही मतभेद उद्भवू शकतात

सिंह - गुंतवणुकीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घ्याल. प्रेमाच्या बाबतील आज विशेष काळजी घ्या. कामातून जास्तीत जास्त अनुभव घेण्याचा प्रयत्न करा.

कन्या- खाण्यापिण्याच्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या. आज आपला मूड खराब होण्याची शक्यता आहे.

तुळ- मानसिक शांततेसाठी, आपली रिकामी बसण्याची सवय धोकादायक आहे. प्रिय व्यक्तीसोबत आपली भेट किंवा संवाद झाल्यानं दिवस आनंदाचा जाईल.

वृश्चिक- भीती आणि चिडचिड आपल्या आरोग्यासाठी हानीकारक आहे. जुन्या गोष्टींमध्ये अडकणं हिताचं नाही.

धनु- संभाव्य धोके लक्षात घेऊन गुंतवणूक करा. जोडीदाराच्या वागण्यामुळे आपल्याला ताण येईल.

मकर- कुटुंबात समस्यांचा सामना करावा लागेल त्यामुळे ताण येईल. प्रेमाच्या बाबतीत गैरसमज निर्माण होईल.

कुंभ- मित्राच्या मदतीनं समस्यांवर मात कराल. आपल्या प्रिय लोकांची मनधरणी करण्यात अपयश मिळेल. जोडीदाराची साथ मिळेल.

मीन- जोडीदार आज आपला दिवस अधिक चांगला बनवेल. आळस जाणवेल. व्यक्तीमत्त्व सुधारण्यावर भर द्या.

संपादन- क्रांती कानेटकर

First published: June 1, 2020, 8:19 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading