राशीभविष्य : कर्क आणि धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आहे शुभ

राशीभविष्य : कर्क आणि धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आहे शुभ

कसा आहे आजचा दिवस जाणून घ्या 06 एप्रिलचं राशीभविष्य.

  • Share this:

मुंबई, 06 एप्रिल : प्रत्येक दिवस सारखा नसतो. या दिवसात आव्हानं कोणती येणार आणि काय संकेत मिळणार हे आधीच समजलं तर पावलं जपून टाकता येतात योग्य निर्णय घेता येतात. त्यासाठी जाणून घ्या 06 एप्रिलचं राशीभविष्य.

मेष - अनुभवातून शिकण्याचा प्रयत्न करा. मनसिक गोंधळातून आपला राग वाढत जाईल. जास्त चिंता आपल्याला मानसिक ताण देईल.

वृषभ- आपल्या क्षेत्रात आजचा दिवस आपल्यासाठी खास आहे. वरिष्ठांचे मन वळवण्याची कला तुमच्या फायद्यात येईल.

मिथुन - आज गुंतवणूक करणे टाळावे. प्रिय व्यक्तीला आनंदीत करण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल.

कर्क - आज आपल्या इच्छा पूर्ण होतील. मागच्या दिवसांच्या मेहनतीचं फळ मिळेल.

सिंह - आरोग्याची विशेष काळजी घ्या. आरोग्य अचानक बिघड्याला अति खर्च वाढेल आणि आपलं बजेट कोलमडेल. प्रेमासाठी आजचा दिवस चांगला आहे. नकारात्मक विचारांवर नियंत्रण मिळवा.

हे वाचा-तबलिगींचा आणखी एक धक्कादायक प्रकार उघड, 2 मजल्यांची परवानगी; बांधली 7 मजली इमारत

कन्या - प्रिय व्यक्तीसोबत पुरेसा वेळ न घालवता आल्यानं चिडचिड होईल. कामाच्या ठिकाणी लिहिताना काळजी घ्या चुका होऊ शकतात.

तुळ - कठीण परिस्थितीत आपला संयम गमावू नका. बोलताना आणि आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

वृश्चिक - आज प्रत्येक मिनिट महत्त्वाचा आहे त्यामुळे वेळ आणि पैसा दोन्ही खर्च करू नका. सकारात्मक विचार केल्यास कामं यशस्वी होतील.

धनु - स्वार्थी लोकांपासून दूर राहा.जास्त खर्च करु नका तुम्हाला पाहिजे असलेल्यांना भेटवस्तूंची देवाणघेवाण करण्याचा चांगला दिवस आहे.

मकर - नवीन आर्थिक योजनांचा सामना करावा लागेल. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी चांगल्या आणि उणीवा काळजीपूर्वक पाहा आणि मग निर्णय घ्या

कुंभ- गुंतवणूक करण्याआधी त्याची सखोल माहिती घ्या. कोणताही निर्णय घेण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.प्रिय व्यक्तीला पुरेसा वेळ न दिल्यानं रागाचं कारण होईल.

मीन- घरगुती तणाव आपल्या रागाचं कारण होऊ शकतं.

हे वाचा-Sex मुळे कोरोनाव्हायरसचा धोका आहे का? काय आहे तज्ज्ञांचं म्हणणं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 6, 2020 07:28 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading