राशीभविष्य : मिथुन आणि कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस असू शकतो त्रासदायक

राशीभविष्य : मिथुन आणि कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस असू शकतो त्रासदायक

कोणाचे स्टार्स चमकणार कोणाला करावा लागणार समस्यांचा सामना जाणून घ्या 3 जूनचं राशीभविष्य.

  • Share this:

मुंबई, 03 जून: प्रत्येक दिवस सारखा नसतो. आपल्या राशीतील बदलत्या ग्रहांच्या स्थितीचा परिणाम आपल्यावर होत असतो. त्यामुळे येणाऱ्या समस्या आणि संभाव्य धोके माहीत असतील तर त्याचं निराकरण करणं अधिक सोपं जात त्यासाठी जाणून घ्या कसा असेल 3 जूनचा दिवस.

मेष - आपल्या वागण्यामुळे जोडीदारास राग येण्याची शक्यता आहे. जोडीदाला समजून घेण्यात आपली चूक होईल. प्रिय व्यक्तीचा मूड चिडचिडा असेल. आजचा दिवस त्रासदायक असू शकतो.

वृषभ- आरोग्याची काळजी घ्या. घरगुती समस्या सोडवण्यात पुढाकार घ्यावा लागेल. वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होईल.

मिथुन- अडकलेली कामं पूर्ण करण्यावर भर द्या. आर्थिक समस्यांचा सामना करावा लागेल. प्रेमाच्या बाबतीत गैरसमज होण्याची शक्यता आहे.

कर्क- मानसिक शांतता मिळेल विश्रांती घेण्याची गरज आहे. करमणुकीवर जास्त खर्च करू नका.

सिंह - आर्थिक अडचणींचा सामना करावा लागेल. कामाच्या ठिकाणी दबाव जाणवेल.

कन्या- बँकेचे व्यवहार करताना आज खूप सावधगिरी बाळगणं महत्त्वाचं आहे. प्रिय व्यक्ती आज आपल्याला दुखावू शकते. छंद जोपासल्यानं आपला मूड थोडा चांगला राहिल.

तुळ- आज आपला उत्साह दुप्पट असेल. वरिष्ठांचा सल्ला महत्त्वाचा आहे.

वृश्चिक- घाईत गुंतवणूक करू नका. कौटुंबीक वातावरण अशांत असल्यानं ताण येईल.

धनु- पुरेशी विश्रांती न घेतल्यास खूप थकवा जाणवेल. अचानक पैसे तुमच्याकडे येतील

मकर- शारीरिक समस्या उद्भवतील. आपल्या जोडीदारासह घरातील रखडलेली कामे पूर्ण करण्याची व्यवस्था करा.

कुंभ- घाईनं कोणतेही निर्णय घेऊ नका. दिवसभर काम करणं त्रासदायक असू शकतं.

मीन- करमणुकीवर जास्त पैसे आणि वेळ खर्च करू नका. जोडीदारावर संशय घेणं टाळा.

संपादन- क्रांती कानेटकर

First published: June 3, 2020, 8:46 AM IST

ताज्या बातम्या