Home /News /lifestyle /

काही केल्या पैशाचं गणित जमतच नाही? पिवळी मोहरी घरात अशी वापरून बघा परिणाम

काही केल्या पैशाचं गणित जमतच नाही? पिवळी मोहरी घरात अशी वापरून बघा परिणाम

आर्थिक चणचण होऊ नये म्हणून पिवळ्या मोहरीचे काही उपाय ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहेत. ज्याबद्दल भोपाळचे ज्योतिषी हितेंद्र कुमार शर्मा यांनी सविस्तर माहिती सांगितली आहे.

    मुंबई, 28 मे: प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी, प्रगती आणि चांगले आरोग्य हवे असते आणि त्यासाठी आपण कठोर परिश्रमही करतो. पण कधी कधी काही कारणांमुळे मेहनतीचे फळ 100% मिळत नाही. अशा स्थितीत व्यक्तीच्या आयुष्यात पैशाशी संबंधित समस्या येऊ लागतात. आर्थिक संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी ज्योतिषशास्त्रात विविध उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय केल्याने कामात यश मिळते तसेच मनोकामनाही पूर्ण (Yellow mustard and astrology) होतात. या उपायांपैकी एक म्हणजे पिवळ्या मोहरीचे काही उपाय, ज्याबद्दल भोपाळचे ज्योतिषी हितेंद्र कुमार शर्मा यांनी सविस्तर माहिती सांगितली आहे. पैशाशी संबंधित समस्यांवर उपाय - जर एखाद्या व्यक्तीला अनेक दिवसांपासून पैशाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागत असेल तर अशा व्यक्तीने गुरुवारी पिवळी मोहरी गंगाजलाने धुवावी आणि त्यातील काही दाणे पिवळ्या कपड्यात कापरात बांधून घराच्या मुख्य दरवाजावर टांगावे. असे मानले जाते की असे केल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात. - नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी जर एखाद्या व्यक्तीला असे वाटत असेल की, आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा वास करत आहे. तर अशा व्यक्तीने दररोज आपल्या घरात पिवळी मोहरी शिंपडावी. असे मानले जाते की, असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो तसेच घरात अन्न आणि धनाची वाढ होते. हे वाचा - टक्कल पडलेल्यांसाठी आशेचा किरण! या औषधामुळे सहा महिन्यात पुन्हा उगवणार केस - आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी खूप कष्ट करूनही जर एखाद्या व्यक्तीची आर्थिक स्थिती सुधारत नसेल तर पिवळी मोहरी घरातील प्रमुख व्यक्तीच्या डोक्याभोवती ओवाळून घराबाहेर कुठेतरी लांब फेकून द्यावी. ज्योतिष शास्त्रानुसार असे केल्याने व्यवसाय आणि नोकरीशी संबंधित समस्या दूर होतात. यासोबतच आर्थिक स्थितीही मजबूत होते. हे वाचा - फेस पॅक आणि फेशियल टोनर म्हणून समुद्री मिठाचा असा करा उपयोग, स्कीन होईल ग्लोइंग - डोळ्यांच्या दोषांसाठी वास्तुशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीवर किंवा त्याच्या घरावर नेत्रदोष असेल तर थोडी पिवळी मोहरी घेऊन घरातील सर्व खोल्यांमध्ये शिंपडावी. असे केल्याने घरातील दृष्टी दूर होते आणि घरात सुख-समृद्धी येते असे मानले जाते. (या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही. त्यांचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Astrology and horoscope, Lifestyle

    पुढील बातम्या