मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /पत्रिकेतला कालसर्प योग नेतो रसातळाला; यशाच्या वाटेवर वाढवतात अडचणी

पत्रिकेतला कालसर्प योग नेतो रसातळाला; यशाच्या वाटेवर वाढवतात अडचणी

ज्योतिष शास्त्रानुसार 12 राशींचं वेगळं महत्त्व आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार 12 राशींचं वेगळं महत्त्व आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार (Astrology) राहु,केतूची दशा आणि कालसर्प योग आयुष्यात संकटांची मालिकाच सुरू करतात.

नवी दिल्ली, 21 जुलै : ज्योतिष शास्त्रानुसार (According to Astrology प्रत्येकाच्या पत्रिके मधील ग्रह,नक्षत्र,व्यक्तीची रास यांच्याबरोबरच त्या व्यक्तीच्या पत्रिकेमधील कालसर्पयोग (kaalsarp) हा त्यांच्या आयुष्यावर परिणाम करत असतो. कालसर्प योग पत्रिकेतल्या राहू आणि केतूच्या स्थान यावरून आयुष्यात किती अडचणी येणार हे ज्योतिष शास्त्र (Astrology) सांगू शकतं. राहू,केतू आणि इतर ग्रह मिळून नऊ ग्रह पत्रिकेत असतात. ज्यांच्या पत्रिकेत या दोन ग्रहांबरोबर इतर 7 ग्रह येतात. त्यालाच कालसर्प योग म्हटलं जातं. ज्यांच्या पत्रिकेत हा योग असतो. त्यांना आयुष्यात अनंत अडचणी येतात. कालसर्पयोग दूर करण्यासाठी काही उपायही (Remedies) करता येऊ शकतात.कालसर्प योग आणि संकटकालसर्प योग असल्यास आयुष्यात संकटांची मालिकाच तयार व्हायला लागतात.कितीही मेहनत केली तरी यश मिळत नाही. प्रत्येक छोट्या कामांमध्ये अडचणी निर्माण होत असतात. त्यामुळे होत आलेली कामदेखील अडकून राहतात. यामुळे त्या व्यक्तीला मानसिक त्रास सहन करावा लागतो. आयुष्यात सतत अशांतता असते. याच काळात पत्रिकेतील राहू आणि केतूची दशा देखील शक्तिशाली बनते आणि मग आजारपण संकट देखील मागे लागतात. राहू-केतू आणि कालसर्पयोग यामुळे आयुष्यातली सुख-शांती संपून सतत नकारात्मकता जागा घेते.

(पैसे चुकीच्या खात्यात जमा झाले? घाबरू नका, वापरा ही ट्रिक)

कालसर्प योगवरचे उपाय

कालसर्प दोष असलेली व्यक्ती आरोग्य, करीअर, कुटुंब, मुलं, संसार, शिक्षण, नोकरी अशा सगळ्याच अडचणींमध्ये सापडलेली असते. ज्यांच्या पत्रिकेमध्ये कालसर्प दोष असतो त्यांना स्वप्नामध्ये साप दिसतो. यामुळे सतत झोपमोड होत राहते असं ज्योतिष शास्त्र सांगतात.

(नको चिंता पावसाळ्याची; ‘या’ टिप्स वापरून घ्या बागेची काळजी)

कालसर्प दोष असलेल्या व्यक्तीने शंकराची पूजा करावी याशिवाय गोमेद घालण्याचा सल्ला देखील ज्योतिष शास्त्रानुसार दिला जातो. चांदीची सापाच्या आकाराची अंगठी बनवावी आणि त्यामध्ये गोमेद धारण करावा. याशिवाय एखाद्या नदीमध्ये चांदी किंवा तांब्याच्या धातूंनी बनलेल्या नागांची जोडी प्रवाहीत करावी.

(देवशयनी एकादशीनंतर 4 महिने योगनिद्रेत असणार विष्णू; अडकतील सगळी शुभकार्य)

शनिवारी पिंपळाच्या झाडाला जल अर्पित करावं आणि त्याच्या साथ प्रदक्षिणा कराव्यात. मध्य प्रदेश मधल्या उज्जैन किंवा महाराष्ट्रातल्या नाशिक या ठिकाणी कालसर्प दोष मुक्तीसाठी पूजा करता येते.

(Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)

First published:
top videos

    Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya, Rashichark