मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

भाग्यशाली असतात या 4 राशींच्या मुली; कुटुंबावर होतो लक्ष्मीच्या कृपेचा वर्षाव

भाग्यशाली असतात या 4 राशींच्या मुली; कुटुंबावर होतो लक्ष्मीच्या कृपेचा वर्षाव

ज्योतिष शास्त्रानुसार 12 राशींचं वेगळं महत्त्व आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार 12 राशींचं वेगळं महत्त्व आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार (Astrology) काही राशीच्या मुली अतिशय भाग्यवान असतात ज्यांच्यावर ग्रहांची जास्त कृपा असते.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 09 जुलै : ज्योतिष शास्त्रानुसार (Astrology) जन्माला येणारा प्रत्येक व्यक्ती आपलं भाग्य घेऊन जन्माला येतो. काही लोकांना भाग्याची साथ मिळत असल्यामुळे अगदी थोड्या प्रयत्नात जास्त यश मिळवतं मात्र, काही जण कितीही कष्ट केले तरी आपयशी ठरत असतात. ज्योतिष शास्त्रानुसार 12 राशींपैकी 4 राशी (Zodiac Sing) अशा आहेत ज्यांना भाग्यवान मानलं जातं. खास करून या 4 राशीच्या मुली अतिशय भाग्यवान असतात. त्यामुळे ज्या घरामध्ये जातात त्या घरांमध्ये धनसंपत्ती वाढत जाते.

धनु रास

धनु राशीचा स्वामी ग्रह गुरु आहे. गुरु अतिशय शुभ ग्रह मानला जातो. या ग्रहाच्या प्रभावामुळे धन आणि संपत्तीची प्राप्ती होते. धनु राशीवर ग्रहांची विशेष कृपा असल्यामुळे या राशीचे लोक भाग्यवान मानले जातात. हे लोक जे काम हातात घेतात त्यात त्यांना यश मिळतं. या राशीच्या मुली अतिशय नशिबवान असतात. त्यांना सासरी कशाचीच कमी भासत नाही.

(पायाच्या बोटांवरून कळतो तुमचा स्वभाव;अशा पायाचे लोक असतात Lucky)

मीन रास

या राशीच्या मुली मनाने अतिशय प्रेमळ आणि गुणवान असतात. त्या स्वतःबरोबर इतरांसाठी देखील भाग्यशाली मानल्या जातात. ज्यांच्या घरात जातात त्या घरामध्ये सुख संपत्ती प्राप्त होते. या राशीच्या मुली आपल्या करिअरमध्ये उच्च स्थान प्राप्त करता.

वृषभ रास

वृषभ राशीच्या मुली अतिशय बुद्धिमान मेहनती आणि भाग्यवान असतात. त्या आपल्या मेहनतीने करिअरमध्ये यशस्वी होतात. यांच्यासोबत जोडल्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ही त्यांच्या भाग्याचा लाभ मिळत असतो.

(संपतील नोकरीतल्या सगळ्या अडचणी;शुक्रवार करा प्रभावी उपाय)

कर्क रास

कर्क राशीचे लोक भाग्यवान मानले जातात. ज्या कामात हात घालतात त्या कामात सफल होतात. या राशीच्या मुलींची नशीब फार बळकट असतं त्यामुळे त्यांना सुख समृद्धी प्राप्त होते.

(Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)

First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya, Rashichark