Home /News /lifestyle /

अविचाराने वागतात 5 राशीचे लोक; असते नुसती घाई

अविचाराने वागतात 5 राशीचे लोक; असते नुसती घाई

ज्योतिष शास्त्रानुसार 12 राशींचं वेगळं महत्त्व आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार 12 राशींचं वेगळं महत्त्व आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार (Astrology)काही राशीच्या लोकांचा स्वभाव त्याचा शत्रू ठरतो त्याच्या स्वभावामुळे त्यांची कामं होत नाहीत आणि लोकंही दूर पळतात.

    नवी दिल्ली, 05 जुलै: ज्योतिष शास्त्रानुसार (Astrology)12 राशींचं वेगळं महत्त्व आहे. प्रत्येक राशीचे (Zodiac Sing) स्वतःचे स्वभाव गुण असतात. राशीनुसार त्यांचा स्वामी असतो आणि त्याच्या प्रभावनुसार या राशींचं भाग्य ठरत असतं. प्रत्येक राशीची व्यक्ती आयुष्यामध्ये चढ-उतार अनुभवत असते. ग्रहमान बदललं की आयुष्यामध्ये काही बदल देखील घडत असतात. प्रत्येक राशीमध्ये काही गुण असतात तर, काही दोष असतात. काही राशींमध्ये स्वभाव सगळ्या कामात घाई करण्याचा असतो. त फार तोंडाळ असतात बोलताना विचार करत नाहीत. त्यामुळे त्यांना दुष्परिणाम भोगावे लागतात जाणून घेऊयात त्या राशींबद्दल. मेष रास मेष राशीचे लोक फटकळ असतात. कोणाला काहीही बोलतात. काम करण्याआधी विचार करत नाहीत. प्रत्येक कामात घाई लागलेली असते. त्यांच्या याच स्वभावामुळे ते अडचणीत येता. मेष राशीचे लोक बिनधास्त असतात. त्यामुळेच कोणालाही काहीही बोलतात. (प्रवास, शिक्षण आणि शेती करताना लक्षात ठेवा चाणक्यांनी सांगितलेले कानमंत्र) मिथुन रास मिथुन राशीचे लोकही बोलण्याआधी विचार करत नाहीत. प्रत्येक काम लवकर संपवण्याची त्यांना इच्छा असते. फटकळ स्वभाव, अविचाराने काम करणं यामुळे अडचणीत येतात. त्यांचा स्वभावच त्यांचा शत्रू ठरतो. धनु रास धनु राशीचे लोक घाईत निर्णय घेतात आणि तशीच कृतीही करतात. धनुचे लोक कोणालाही काहीही बोलतात. त्यामुळे लोकांसमोर कधीकधी त्यांची फजितीही होते. त्यामुळे धनु राशीच्या लोकांनी बोलण्याआधी विचार करावा. (लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात म्हणतात; कुठल्या राशीच्या जोडीदाराशी पटेल) कुंभ रास कुभं राशीच्या लोकांमध्ये धीर धरण्याची क्षमता नसते. त्यांना भरकन कामं करायची असतात. त्यामुळे गडबड होते. त्यातच फटकळ असल्याने कोणी मदतीला येत नाही. हो लोक इतरांचा विचार करतात. पण, बोलताना संयम बळगत नाहीत त्यामुळे लोकांची मनं दुखावतात. (मानेचा आकारही सांगतो माणसाचा स्वभाव; हे वाचल्यावर तुम्हीही माणसं ओळखाल) मीन रास मीन राशीचे लोक बोचऱ्या शब्दात बोलतात. हे लोक विचार न करता काहीही बोलतात. मीन राशीच्या लोकांनी काहीही करण्यापूर्वी किंवा बोलण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. घाईमुळे या लोकांना बर्‍याचदा त्रास सहन करावा लागतो. (Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Astrology and horoscope, Lifestyle

    पुढील बातम्या