मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

‘ही’ 2 स्वप्ने पडल्यास व्हा सावध, आयुष्यावर पडू शकतो वाईट प्रभाव

‘ही’ 2 स्वप्ने पडल्यास व्हा सावध, आयुष्यावर पडू शकतो वाईट प्रभाव

स्वप्न विज्ञानात (Dream Science) स्वप्नांना भविष्याचे संकेत मानले जात आहेत. ज्योतिषशास्त्रात प्रत्येक स्वप्नाचा काही ना काही अर्थ असतो.

स्वप्न विज्ञानात (Dream Science) स्वप्नांना भविष्याचे संकेत मानले जात आहेत. ज्योतिषशास्त्रात प्रत्येक स्वप्नाचा काही ना काही अर्थ असतो.

स्वप्न विज्ञानात (Dream Science) स्वप्नांना भविष्याचे संकेत मानले जात आहेत. ज्योतिषशास्त्रात प्रत्येक स्वप्नाचा काही ना काही अर्थ असतो.

 मुंबई, 26 जुलै :   आपल्याला झोपेत स्वप्नं पडतात. अनेकदा सुंदर स्वप्नं आपल्याला खूप आनंद (Happiness) देऊन जातात. आपल्याला स्वप्नांच्या दुनियेत रमून जायला आवडतं, पण सुंदर स्वप्नांप्रमाणे काही वेळा वाईट, भीतिदायक स्वप्नंही (Bad Dreams) पडतात. अनेकांना अतिशय चित्रविचित्र स्वप्नं पडत असतात. अनेकदा आपल्याला त्या स्वप्नांचा काहीच अर्थ लागत नाही. बहुतांश वेळा तर आपण रात्री झोपेत पडलेली स्वप्नं विसरूनही जातो; पण कधीकधी मात्र काही स्वप्नं विसरता येत नाही, त्यात ते वाईट स्वप्न असेल तर त्याचा विचार आपला पिच्छा सोडत नाहीत. या स्वप्नाचा नेमका अर्थ काय असेल, या विचाराने आपण अस्वस्थ होतो आणि आपल्याल टेन्शन येतं.
प्रत्येक स्वप्नाचा अर्थ
स्वप्न विज्ञानात (Dream Science) स्वप्नांना भविष्याचे संकेत मानले जात आहेत. ज्योतिषशास्त्रात प्रत्येक स्वप्नाचा काही ना काही अर्थ असतो. ही स्वप्नं प्रत्येकवेळी तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडणार आहे किंवा काहीतरी वाईट होणार आहे, याचे संकेत देतात. ज्योतिषशास्त्रामध्ये स्वप्नांबाबत अनेक उपायही सांगण्यात आले आहेत. त्याच्या माध्यमातून तुम्ही तमच्या स्वप्नांच्या वाईट परिणामांपासून स्वतःचा बचाव करू शकता. स्वप्नात बासरी वाजवताना दिसल्यास किंवा स्वतःला तीळ खाताना पाहिल्यास त्याचा अर्थ काय, याबद्दल आचार्य विक्रमादित्य यांनी सांगितलंय. 'झी न्यूज हिंदी'नं या संदर्भात वृत्त दिलंय.
 
बासरी वाजवताना दिसल्यास काय होतं?
स्वप्नात बासरी वाजवणं हे शुभ मानलं जात नाही. याचा अर्थ तुम्ही विनाकारण अडचणीत येऊ शकता, तसंच तुम्हाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. आयुष्यात कधीकधी विनाकारण माणसाला अनेक मोठ्या आव्हानांना तोंड द्यावं लागतं. त्यामुळे तुमचे विचार आणि वर्तणूक बदलते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या बोलण्यावर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवायला हवं. असं केल्यास तुम्ही भविष्यात ओढवणाऱ्या मोठ्या संकटांपासून वाचाल. स्वप्नात तीळ खाण्याचा अर्थ काय?
स्वप्नात स्वतःला तीळ खाताना पाहणं, शुभ संकेत मानलं जात नाही. त्याचा जीवनावर नकारात्मक परिणाम होतो. त्याचा अर्थ येणाऱ्या काळात काही कारणाने तुम्हाला कुटुंबात आणि समाजात अपमानाला सामोरं जावं लागू शकतं. तुमचं चारित्र्य आणि वर्तणुकीवर आरोप होऊ शकतात. त्यामुळे तीळ खाण्याचं स्वप्न पडल्यास भविष्यात तुमची बदनामी होईल, असा त्याचा अर्थ निघतो.
स्वप्नांचे वेगवेगळे अर्थ असतात, प्रत्येकच स्वप्नाचा काही ना काही अर्थ असतो, पण तो आपल्याला माहित असेलच असं नाही. त्यामुळे स्वप्न पडल्यानंतर जाणकारांकडून तुम्ही त्याच्या अर्थांबद्दल माहिती मिळवू शकता.
First published:

Tags: Astrology and horoscope, Sleep

पुढील बातम्या