• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • गुरू पौर्णिमेला आहे शुभ योग; या प्रकारे करावी पूजा; होतील मनातल्या इच्छा पूर्ण

गुरू पौर्णिमेला आहे शुभ योग; या प्रकारे करावी पूजा; होतील मनातल्या इच्छा पूर्ण

आषाढ पौर्णिमेच्या दिवशी देवर्षी व्यास यांचा जन्म झाला असं मानलं जातं.

आषाढ पौर्णिमेच्या दिवशी देवर्षी व्यास यांचा जन्म झाला असं मानलं जातं.

Guru Purnima 2021: गुरु पौर्णिमेच्या दिवशी गंगा स्नान करून दानधर्म करणं शुभ मानलं जातं. या दिवशी गंगा नदीत स्नान केल्यास पुण्य मिळतं.

 • Share this:
  दिल्ली, 23 जुलै : आज सकाळी 10 वाजून 43 मिनीटांनी सुरु होणारी गुरु पौर्णिमा 24 जुलै 2021 ला सकाळी संपणार आहे. देशभरात गुरू पौर्णिमा (Guru Purnima) उत्साहात साजरी केली जाते. गुरु पौर्णिमेच्या दिवशी गंगा स्नान आणि दान करणं शुभ मानलं जातं. या दिवशी पवित्र गंगा (Ganga) नदीत स्नान केल्यास पुण्य मिळतं. आषाढ पौर्णिमेच्या दिवशी देवर्षी व्यास यांचा जन्म झाला असं मानलं जातं. अनेक शतकांपासून व्यासांच्या जन्मदिनी गुरु पौर्णिमेला गुरुची पूजा केली जाते. गुरु पौर्णिमेला व्यास पूर्णिमा म्हणूनही ओळखलं जातं. हिंदू धर्मातील 18  पुराणांची निर्मिती ऋषी वेद व्यास यांनी किली. प्रत्येकाच्या आयुष्यात गुरुचं स्थान हे भगवंतासारखंच आहे. व्यक्तीचं ज्ञान (Knowledge) वाढवणारे गुरू आहेत. केवळ गुरुने दाखविलेल्या मार्गाने आणि ज्ञानानेच एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातील वेळोवेळी येणारा सर्व अंधकार दूर करून यशाची शिडी चढते. म्हणूनच गुरु पौर्णिमेला महत्त्व आहे. गुरु पौर्णिमेचा शुभ काळ गुरु पौर्णिमे प्रारंभ : शुक्रवार 23 जुलै 2021ला सकाळी 10.43 समाप्ती             : शनिवारी 24 जुलै 2021 ला सकाळी 08.06 गुरु पौर्णिमेच महत्व सर्व धर्मांमध्ये गुरुचं स्थान सर्वोच्च मानलं जातं. अनेक पौराणिक मान्यतांनुसार महाभारताचे थोर ऋषी वेद व्यास यांचा जन्म गुरु पौर्णिमेच्या दिवशी झाला. म्हणूनच गुरु पौर्णिमेला व्यास पौर्णिमा देखील म्हटलं जातं. या दिवशी लोक ऋषी वेद व्यासांची पूजा करतात. तसच गुरू, इष्ट आणि आराध्य देवतांची पूजा करतात आणि त्यांचं आशीर्वाद मागतात. गुरुकुल काळापासून ही परंपरा पाळली जाते. गुरु पौर्णिमेला शुभ योग यावर्षी गुरु पौर्णिमेला सकाळी 6.12 पासून विष्कुंभ योग, त्यानंतर 25 जुलैला सकाळी 3.16 पर्यंत प्रिती योग असेल आणि त्यानंतर आयुष्मान योग होईल. ज्योतिषशास्त्रात प्रीती आणि आयुष्मान योग एकत्र येणं शुभ मानलं जातं. प्रीती आणि आयुष्मान योगाच्या काळात केलेल्या कामात यश मिळतं. मात्र वैदिक ज्योतिष शास्त्रात विष्कुंभ योगाला योग मानलं जात नाही. गुरु पौर्णिमा पूजा ज्योतिषशास्त्रानुसार,गुरु पौर्णिमेला विड्याची पानं,नारळ,मोदक, कापूर,लवंगा,वेल यासह पूजन केल्यास अपेक्षित परिणाम मिळतो. असे म्हणतात की गंगेमध्ये आंघोळ केल्याने दमा आणि त्वचेच्या आजारांमध्ये फायदा होतो. गुरु पौर्णिमेच्या दिवशी वैदिक मंत्रोच्चार करून विष्णू सहस्त्रनाम पाठ केल्याने गुरुची विशेष कृपा होते. गुरु पौर्णिमेच्या दिवशी स्वत:च्या हातांवी खीर तयार करून दान केल्याने मानसिक शांती मिळते. चंद्राचा प्रभाव देखील दूर होतो. (Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)
  Published by:News18 Desk
  First published: