दिल्ली, 14 जुलै : आषाढ महिना धार्मिक दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण आणि लाभदायक असतो. याच महिन्यामध्ये चातुर्मासाची सुरुवात होते. चातुर्मासात भगवान विष्णू झोपतात आणि शंकर देव भक्तांचं कार्य करतात कशी मान्यता आहे. 11 जुलैपासून आषाढ महिना सुरू झाला आहे. या महिन्यांमध्ये बुध,शुक्र,सूर्य आणि मंगळ यांचं राशी परिवर्तन होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार (According to Astrology) हे राशी परिवर्तन काही राशींसाठी (Zodiac Sing) लाभदायक ठरणार आहे. जाणून घेऊयात जुलै महिन्यामध्ये कोणत्या राशींना फायदा (Lucky Month) मिळणार आहे.
मिथुन रास
मिथुन राशीच्या लोकांसाठी जुलै महिना अतिशय शुभ आहे. या काळात मिथुन राशीच्या लोकांवर लक्ष्मीची कृपा होणार आहे. त्यामुळे त्यांच्या आर्थिक समस्या संपणार आहेत. नोकरी आणि व्यवसायामध्ये प्रगती होणार आहे. हाती घेतलेल्या कार्यामध्ये यश मिळणार आहे.
(शनिदेवांना प्रिय असून या 3 राशीत सुरू आहे साडेसाती)
तुळ रास
तुळ राशीच्या लोकांसाठी जुलै महिना शुभ असणार आहे. या महिन्यांमध्ये त्यांच्यावर लक्ष्मीची अपरिमित कृपा होणार आहे. या काळात आर्थिक उन्नती होणार आहे. कौटुंबिक संबंधांमध्ये फायदा होणार आहे. नोकरी आणि व्यापारामध्ये अडचणी दूर होतील. या महिन्यामध्ये हाती घेतलेलं काम यशस्वी होईल. या काळात लक्ष्मीची आराधना करावी.
(कपड्यांवरील मेकअपचे डाग घालवण्यासाठी करून पाहा हे काही घरगुती उपाय)
कुंभ रास
कुंभ राशीच्या लोकांसाठी जुलै महिना अतिशय महत्त्वाचा आहे. या राशीच्या लोकांना या काळामध्ये धनलाभ होणार आहे. लक्ष्मीच्या कृपेमुळे संपत्तीमध्ये वाढ होणार आहे. या दिवसांमध्ये धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यामध्ये सहभागी होण्याचा सल्ला दिला जातोय. नवीन काम सुरू करण्यासाठी जुलै महिना अतिशय शुभ ठरणार आहे.
(बस्स! फक्त 10 दिवसांतच...; टेन्शन वाढवणाऱ्या Delta plus बाबत महत्त्वाची अपडेट)
मीन रास
मीन राशीच्या लोकांची या महिन्यामध्ये नोकरी आणि व्यापारात प्रगती होईल. आर्थिक स्थिती सुधारेल. शुभ कार्यामध्ये यश मिळेल. लक्ष्मीच्या कृपेने धनसंपत्ती वाढेल.
(Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.