Home /News /lifestyle /

नशिबाची साथ तुम्हाला नेहमी मिळेल; सकाळी उठल्यानंतर ही छोटीशी कामं न चुकता करा

नशिबाची साथ तुम्हाला नेहमी मिळेल; सकाळी उठल्यानंतर ही छोटीशी कामं न चुकता करा

नशीब चमकणं आणि दुर्दैव, हे सर्व आपल्या दैनंदिन कामे आणि आपल्या कृतींवर अवलंबून असते. सकाळी उठल्यानंतर नेमक्या कोणत्या गोष्टी कराव्यात ज्यामुळे नशीब चमकतं याविषयी जाणून घेऊया.

    मुंबई, 27 जून : आपल्या जीवनात गुड लक आणि बॅड लक खूप महत्त्वाचे आहे. अनेकवेळा आपण कष्ट करून काही काम करतो आणि ते पूर्ण झाले नाही तर त्याला दुर्दैवाशी जोडून पाहतो. याउलट कधी कधी मेहनत न करता काही कामात अनपेक्षित यश (Good Luck) मिळते, मग आपण त्याला नशिबाची साथ आहे म्हणतो. नशीब चमकणं आणि दुर्दैव, हे सर्व आपल्या दैनंदिन कामे आणि आपल्या कृतींवर अवलंबून असते. सकाळी उठल्यानंतर नेमक्या कोणत्या गोष्टी कराव्यात, ज्या केल्याने नशीब नेहमी आपल्यासोबत राहील. भोपाळचे ज्योतिषी हितेंद्र कुमार शर्मा यांनी याबाबत (Bad Luck ghalavnyache Upay) माहिती दिली आहे. देवतेची पूजा - धार्मिक मान्यतांनुसार, सकाळी उठल्यानंतर व्यक्तीने नियमितपणे आपल्या इष्टदेवाची पूजा केली पाहिजे. त्याची उपासना केल्याने दुर्दैवाचे रुपांतर सौभाग्यात होते. त्यामुळे आपले इष्टदेव आपल्याला प्रगतीसाठी आशीर्वाद देतात आणि आपली सर्व संकटे दूर करतात. गायत्री मंत्राचा जप करा - हिंदू धर्मात असे अनेक मंत्र आहेत, ज्यांच्या जपाचा धार्मिक ग्रंथात उल्लेख आहे. त्यापैकी एक गायत्री मंत्र आहे. गायत्री मंत्राचा नियमित जप केल्याने जीवनात सकारात्मकता येते आणि दारिद्र्य दूर होते. याशिवाय त्या व्यक्तीला आयुष्यातील प्रत्येक कामात यश मिळते. जागे होताच तळहाताकडे पहा - अनेकदा तुम्ही ऐकले असेल की सकाळी उठल्यावर आपला तळहाता पाहावा. धार्मिक मान्यतेनुसार माता लक्ष्मी, माता सरस्वती आणि भगवान विष्णू आपल्या दोन्ही तळहातामध्ये वास करतात, त्यामुळे सकाळी उठून दोन्ही हात जोडून ‘कराग्रे वसते लक्ष्मी: करमध्ये सरस्वती। करमूले तु गोविन्द: प्रभाते करदर्शनम्।।’ असा जप करा आणि नंतर हाताच्या तळव्यांकडे पहा. हे वाचा - नाक, तोंड नाही तर शरीराच्या 'या' अवयावानेही घेऊ शकता श्वास, संशोधकांचा दावा तुळशीजवळ दिवा लावावा - हिंदू धर्मात प्रत्येक घरात तुळशीच्या रोपाची पूजा केली जाते. जर तुम्हालाही तुमच्या दुर्दैवाचे रुपांतर सौभाग्यामध्ये करायचे असेल तर सकाळी नियमितपणे उठून स्नान करून तुळशीला तुपाचा दिवा लावावा. हे वाचा - ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवेल या झाडाची साल; खाण्याची पद्धतही समजून घ्या सूर्यदेवाला जल अर्पण करा - सकाळी लवकर उठल्यानंतर नियमित स्नान करून तांब्याच्या कलशात पाणी, रोळी, अक्षत, साखरेची मिठाई आणि लाल फुले टाकून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे. असे केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो, तसेच समाजात मान-सन्मान वाढतो आणि आपल्या क्षेत्रात प्रगती होते. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य ज्योतिषशास्त्राच्या माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Astrology and horoscope, Lifestyle

    पुढील बातम्या