• Home
  • »
  • News
  • »
  • lifestyle
  • »
  • दम्याच्या रुग्णांसाठी भयानक ठरते रात्र; याच वेळेत का येतो Asthma Attack माहिती आहे का?

दम्याच्या रुग्णांसाठी भयानक ठरते रात्र; याच वेळेत का येतो Asthma Attack माहिती आहे का?

75 टक्के रुग्णांना रात्रीच्या वेळी गंभीर अटॅक येतो, असं संशोधनात दिसून आलं आहे.

  • Share this:
मुंबई, 17 सप्टेंबर : दम्याचा (Asthma) आजार असणाऱ्या लोकांना श्वासोच्छवासात अडचण येते हे आपल्याला माहिती आहे. जास्त थकल्यानंतर, धावल्यानंतर किंवा ट्रेकिंगसारख्या प्रकारावेळी अशा लोकांना दम्याचा अटॅक (Asthma Attack) येण्याची भीती असते. त्यामुळे जास्त धावपळ किंवा थकवणारी कामं टाळण्याचा सल्ला दमा असणाऱ्या लोकांना दिला जातो. मात्र, एका नव्या संशोधनात असं समोर आलं आहे, की दमा असणाऱ्या रुग्णांना रात्रीच्या (Asthma attack at night) वेळीही जास्त धोका असतो. कित्येक रुग्णांना रात्री शांत झोपलेलं असतानाच (Asthma attack while relaxed) दम्याचा अटॅक आल्याचं जाणवलं आहे. अमेरिकेतल्या ब्रिघम अँड वुमन हॉस्पिटल आणि ओरॅगन हेल्थ अँड सायन्स युनिव्हर्सिटीमधल्या वैज्ञानिकांनी याबाबत संशोधन केलं आहे. दम्याच्या रुग्णांमध्ये बॉडी क्लॉक (Body clock) हा अतिशय महत्त्वाचा घटक ठरतो, असं या अभ्यासात समोर आलं आहे. सर्काडियन प्रोटोकॉलचा वापर करून वैज्ञानिकांनी दम्याच्या रुग्णांवर हे संशोधन केलं आहे. दी प्रोसिडिंग्ज ऑफ दी नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसच्या जर्नलमध्ये हे संशोधन (Research on Asthma attack) प्रसिद्ध झालं आहे. आपली सर्काडियन सिस्टीम, (Circadian system and asthma) म्हणजेच आपलं बॉडी क्लॉक रुटीन (Asthma and body clock routine) ठराविक वेळेमध्ये शरीराच्या विविध भागांना शिथील करतं. आपल्या मेंदूचा एक विशिष्ट भाग या सिस्टीमला कंट्रोल करतो. आपल्या दिनचर्येप्रमाणे हा भाग आपल्या शरीराला विविध आज्ञा देतो. यामुळेच आपल्याला ठराविक वेळी भूक लागते, तसंच ठराविक वेळी झोप येते. हे वाचा - Health Tips : व्यायाम करताना जास्त घाम निघणे ठरू शकते धोकादायक? दम्याच्या रुग्णांवर करण्यात आलेल्या या संशोधनामध्ये असं दिसून आलं, की ज्या रुग्णांचं बॉडी क्लॉक त्यांच्या फुफ्फुसांना अधिक शिथील (Body clock relaxes lungs) करतं, त्यांना रात्री दम्याचा अटॅक येण्याची शक्यता जास्त असते. तसंच, ज्यांचं बॉडी क्लॉक अनियमित आहे, त्यांना दिवसाच्या कोणत्याही वेळी अचानक दम्याचा अटॅक (Asthma attack) येण्याची शक्यता असते. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, दम्याची लागण असणाऱ्या 75 टक्के रुग्णांमध्ये रात्रीच्या वेळी गंभीर अटॅक येण्याचा प्रकार (Asthma attack at night) दिसून येतो. 17 रुग्णांवर करण्यात आलेल्या या संशोधनामध्ये दिसून आलं, की ब्रोन्कोडायलेटर इन्हेलरचा वापर दिवसाच्या तुलनेत रात्रीच्या वेळी अधिक करण्यात आला होता. यासोबतच, व्यायाम, एअर टेम्परेचर, पोश्चर आणि झोपेच्या सवयी यांचाही परिणाम दम्याच्या रुग्णांवर होतो. या संशोधनाचे सहलेखक आणि ओरॅगॉन इन्स्टिट्यूटमधले प्रोफेसर स्टीव्हन ए. शिया (Steven A Shea) यांनी सांगितलं, की दम्याचा आजार असणाऱ्या लोकांच्या स्लीप सायकलमध्येही बदल दिसून येतो. हे वाचा - High Blood Pressure: रक्तदाबाची समस्या असेल तर खाऊ नका 'हे' पदार्थ, वाढेल मृत्यू यामुळे दमा असलेल्या रुग्णांनी आपली दिनचर्या लक्षात घेऊन, त्यामध्ये आवश्यक ते बदल करण्याची गरज संशोधकांनी व्यक्त केली आहे. यासोबतच, रात्रीच्या वेळी अधिक खबरदारी बाळगणं गरजेचं असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
First published: