US ELECTION च्या एक दिवस आधीच होणार मोठा धमाका! तज्ज्ञांनी जगाला केलं सावध

US ELECTION च्या एक दिवस आधीच होणार मोठा धमाका! तज्ज्ञांनी जगाला केलं सावध

3 नोव्हेंबरला अमेरिकेत निवडणूक (US Presidential election) होणार आहे. मात्र त्याच्या एक दिवस आधी संपूर्ण जगासाठी महत्त्वाची अशी घटना घडणार आहे.

  • Share this:

वॉशिंग्टन, 19 ऑक्टोबर : अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचे (US presidential election) वारे वाहत आहेत. 3 नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे. मात्र त्याच्या एक दिवस आधीच मोठा धमाका होणार आहे. पृथ्वीच्या दिशेनं एक लघुग्रह (asteroid) येत आहे आणि हा लघुग्रह कदाचित 2 नोव्हेंबरला पृथ्वीवर आदळेल. याबाबत तज्ज्ञांनी सावध केलं आहे.

अॅस्ट्रोफिजिसिस्ट नील ड्रीगॅसे टायसन यांनी पृथ्वीच्या दिशेनं लघुग्रह येत असल्याची माहिती दिली आहे. 2018 VP1  हा लघुग्रह पृथ्वीच्या दिशेनं येतो आहे. तो 2 नोव्हेंबरला पृथ्वीला धडकेल, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे पृथ्वीर अमेरिकेतील निवडणुकीच्या एक दिवस आधीचा धमाका होऊ शकतो.

नासाच्या माहितीनुसार 2018 VP1 हा दोन वर्षापूर्वी शोधला गेलेला लघुग्रह आहे. हा अपोलो क्लास लघुग्रह आहे जो पृथ्वीच्या जवळून होणाऱ्या अंतराळ खडकांपैकी एक आहे. यात बरेच खडक आहेत.  VP1 याचा पृथ्वीभवती फिरण्याचा कालावधी सुमारे दोन वर्षांचा आहे आणि हा पृथ्वीवर सुमारे पाच हजार किलोमीटरच्या अंतरावर येईल असा अंदाज आहे.

हे वाचा - अबब! पेरूच्या वाळवंटात सापडली 121 फुटांची 'मांजर'; वाचा काय आहे प्रकार

हा लघुग्रह खूपच लहान आहे.  अवकाशातील कुठलाही लघुग्रह पृथ्वीचं नुकसान करण्यासाठी सुमारे 140 मीटर किंवा 460 फूट एवढा मोठा असावा लागतो. परंतु हा लघुग्रह फक्त एक मीटरचा आहे. हा लघुग्रह खरोखरच पृथ्वीवर आदळण्याची शक्यता कमी आहे. कदाचित तो पृथ्वीच्या बाजूनेदेखील निघून जाईल. आणि जर आलाच तर पृथ्वीचं फारसं नुकसान होणार नाही.

हे वाचा - शास्त्रज्ञांना सापडल्या 13000 वर्षांपूर्वीच्या पाऊलखुणा; दडलाय मायलेकाचा इतिहास

"हा लघुग्रह त्या लघुग्रहांपैकी नाही जो पृथ्वीवर आदळल्यामळे कदाचित डायनासोर नष्ट झाले. या लघुग्रहाचा आकार एखाद्या फ्रिजएवढा आहे. त्यामुळे या ग्रहामुळे आपल्या पृथ्वीचं कोणतंही मोठं नुकसान होणार नाही. कारण नुकसान करण्याइतका तो मोठा ग्रह नाही, यामुळे घाबरून जाऊ नका", असं टायसन यांनी सांगितलं.

Published by: Priya Lad
First published: October 19, 2020, 6:43 PM IST

ताज्या बातम्या