या डॉक्टरचं नाव अरुप सेनापती आहे. ते ईएनटी सर्जन आहे. आसामच्या सिलचर मेडिकल कॉलेजमध्ये कोरोना रुग्णांसमोर त्यांनी गाण्यावर ठेका धरला आहे. पीपीई किट घालूनच ते डान्स करत आहेत. हा फक्त डान्स नाही तर परफेक्ट आणि धमाकेदार डान्स आहे. हे वाचा - VIDEO:..आणि दुर्गा अवतरली! अपहरण करणासाठी आलेल्या अज्ञातांना महिलेनं धू-धू धुतलं डॉ. सैयद फैजान अहमद यांनी आपल्या ट्विटर हँडलवर 18 ऑक्टोबरला हा व्हिडीओ शेअर केला. त्यांनीच आपल्या ट्विटमध्ये या डॉक्टरबाबत माहिती दिली आहे. कोरोना रुग्णांना आनंदी ठेवण्यासाठी डॉ. सेनापती यांनी असा डान्स केल्याचं डॉ. अहमद यांनी सांगितलं. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया आहे. अनेकांनी या डॉक्टरला सॅल्युट करत त्याचे आभारही मानले आहेत. हे वाचा - मालकाचा आनंद पाहून उंटही नाचायला लागले, विश्वास बसत नाही तर पाहा VIDEO याआआधीदेखील मुंबईतील डॉ. रिचा नेगी यांचा पीपीई सूटमधील डान्स सर्वांना खूपच आवडला होता. हाय गरमी या नोरा फतेहीच्या गाण्यावर त्यांनी डान्स केला होता. रिचा यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे होता . आपल्या सहकाऱ्यांचं मनोरंजन करण्यासाठी आणि नकारात्मकता घालवण्यासाठी आपण हा डान्स केल्याचं त्यांनी सांगितलं.Meet my #COVID duty colleague Dr Arup Senapati an ENT surgeon at Silchar medical college Assam . Dancing infront of COVID patients to make them feel happy #COVID19 #Assam pic.twitter.com/rhviYPISwO
— Dr Syed Faizan Ahmad (@drsfaizanahmad) October 18, 2020
आपला घरदार सोडून, आपल्या कुटुंबापासून दूर राहून आपला जीव धोक्यात घालून हे डॉक्टर्स कोरोना रुग्णांची सेवा करत आहेत. विशेष म्हणजे फक्त आपली ड्युटी बजावयची म्हणून ते काम करत नाही, तर आपल्या या कर्तव्यात तसूभरही कसर राहू नये, यासाठी ते प्रयत्न करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.