• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • अ‍ॅस्पिरिन घेतल्यानं Heart Failure चा धोका 26 टक्क्यांनी वाढू शकतो, नवीन संशोधनातील माहिती

अ‍ॅस्पिरिन घेतल्यानं Heart Failure चा धोका 26 टक्क्यांनी वाढू शकतो, नवीन संशोधनातील माहिती

Aspirin linked to heart failure Risk : नवीन संशोधनात असे सांगण्यात आले आहे की, अ‍ॅस्पिरिनमुळे हृदय फेल (Heart Failure) होण्याचा धोका 26 टक्क्यांनी वाढतो. हा अभ्यास युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजीच्या (European Society of Cardiology) 'ईसीएस हार्ट फेल्युअर' (ESC Heart Failure) जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर : आजच्या धावपळीच्या जीवनात डोकेदुखी, अंगदुखी, तणाव, ताप ही लक्षणे अति थकव्यामुळे दिसून येतात. त्यातून आराम मिळण्यासाठी आपण लगेच वेदनाशामक औषधं घेतो. परंतु, हे जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे की, एखाद्या रोगाच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या औषधांमुळे त्वरित आराम मिळतो, परंतु नंतर त्याचे दुष्परिणाम दिसून येतात. म्हणूनच नेहमी असा सल्ला दिला जातो की, स्वतःच्या मनाने कोणती औषधं घेऊ नये. अंगदुखी, ताप, सूज किंवा जळजळ कमी करण्यासाठी तसेच हृदयविकाराचा झटका आल्यानंतर लगेच जीव वाचवण्यासाठी अॅस्पिरिन (Aspirin) हे औषध दिलं जातं. मात्र, याचे काही दुष्परिणाम समोर येत आहेत. नवीन संशोधनात असे सांगण्यात आले आहे की, अ‍ॅस्पिरिनमुळे हृदय फेल (Heart Failure) होण्याचा धोका 26 टक्क्यांनी वाढतो. हा अभ्यास युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजीच्या (European Society of Cardiology) 'ईसीएस हार्ट फेल्युअर' (ESC Heart Failure) जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. स्मोकिंग, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉल, मधुमेह आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग यांसारख्या प्रकारामुळं देखील हृदय फेल होऊ (Aspirin linked to Heart Failure Risk) शकतं. जर्मनीतील फ्रीबर्ग विद्यापीठातील (University of Freiburg) शास्त्रज्ञ आणि या अभ्यासाचे लेखक डॉ. ब्लेरिम मुजाज यांच्या मते, 'हा तसा पहिलाच अभ्यास आहे, ज्यामध्ये एस्पिरिन घेणार्‍या व्यक्तीची तुलना हे औषध न घेणार्‍यांशी करण्यात आली. मात्र अद्याप या संशोधनाच्या निष्कर्षांना मान्यता देण्यात आलेली नाही. पण, हृदयाचा धोका आणि त्यावेळी वापरले जाणारे अ‌ॅस्पिरीन यांचा संबंध आहे. हृदयविकाराच्या बाबतीत अॅस्पिरिनच्या परिणामाबद्दल जगभरातील तज्ञांचे एकमत नाही. या औषधामुळे हृदयविकार नसलेल्या लोकांमध्ये नवीन धोका निर्माण होतो का? याचाही संशोधनात अभ्यास करण्यात आला. अभ्यास कसा झाला? पश्चिम युरोप आणि अमेरिकेत, होमेज अभ्यासात सहभागी असलेल्या 30 हजार 827 लोकांच्या डेटाचे विश्लेषण करण्यात आले, ज्यांना हृदय अपयशाचा धोका होता. ज्या लोकांना धूम्रपान, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉल, मधुमेह आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांची एक किंवा अधिक लक्षणे होती त्यांना जोखीम श्रेणीमध्ये ठेवण्यात आले होते. अ‍ॅस्पिरिन घेणारे आणि ज्यांनी अ‍ॅस्पिरिन घेतले नाही अशा दोन गटांमध्ये विभागले गेले. यानंतर त्यांच्या आरोग्यावर नेहमी लक्ष ठेवण्यात आलं. ज्यात माहिती गोळा करण्यात आली की, कोणाची पहिल्यांदा हृदयक्रिया बंद कधी झाली? ते त्यातून वाचले की त्यांचा मृत्यू झाला? किंवा त्याला रुग्णालयात दाखल करण्याचे कारण काय होते? बेसलाइनवर, 7 हजार 698 म्हणजे सुमारे 25 टक्के लोक ऍस्पिरिन घेत होते. यानंतर, 5.3 वर्षांच्या फॉलोअपमध्ये असे आढळून आले की 1330 लोकांना हृदय फेल होण्याची नवीन समस्या आहे. हे वाचा - Amazon विरुद्ध व्यापारी संघटनेचा एल्गार, देशातील 500 जिल्ह्यांमध्ये आंदोलन; वाचा सविस्तर कारणं अभ्यासात काय झाले? याच्या आधारे, संशोधकांनी अ‍ॅस्पिरिनचा वापर आणि हृदय अपयशाच्या घटना यांच्यातील संबंध तपासला. ज्यामध्ये लिंग, वय, बॉडी मास इंडेक्स, धूम्रपान, मद्यपान, रक्तातील कोलेस्टेरॉल, उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग आणि त्यांच्या उपचारात वापरण्यात येणारी औषधे यांचीही काळजी घेण्यात आली. त्यात असे आढळून आले की, जे लोक अ‍ॅस्पिरिनचा स्वतंत्रपणे वापर करतात त्यांना हृदयाच्या विफलतेचा नवीन धोका होता आणि हा धोका 26 टक्क्यांनी वाढला. हे वाचा - वीज बिल भरण्यासाठी NPCI Bharat Billpay चा खास उपक्रम, कसा फायदा होईल? या अभ्यासाच्या परिणामांची पुष्टी करण्यासाठी, संशोधकांनी हृदयाच्या विफलतेच्या जोखमीची तुलना अ‍ॅस्पिरिन घेणे आणि न घेणे यातील इतर घटकांशी केली आणि त्यातही हृदय अपयशाचा धोका 26 टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले.
  Published by:News18 Desk
  First published: