मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

मुलींनी लग्नाआधी जोडीदाराला ‘हे’ 4 प्रश्न विचारणं अत्यावश्यक; अन्यथा नंतर होईल पश्चाताप

मुलींनी लग्नाआधी जोडीदाराला ‘हे’ 4 प्रश्न विचारणं अत्यावश्यक; अन्यथा नंतर होईल पश्चाताप

लग्नाच्या बंधनात बांधलं जाण्याआधीच तुमच्या होणाऱ्या जोडीदाराला काही प्रश्न विचारणं अगदी गरजेचं असतं. या प्रश्नांची उत्तरं वेळीच मिळाली नाहीत तर नंतर पश्चाताप होऊ शकतो. लग्नाच्या आधी तुमच्या जोडीदाराला हे प्रश्न नक्की विचारा (Marriage Tips)

लग्नाच्या बंधनात बांधलं जाण्याआधीच तुमच्या होणाऱ्या जोडीदाराला काही प्रश्न विचारणं अगदी गरजेचं असतं. या प्रश्नांची उत्तरं वेळीच मिळाली नाहीत तर नंतर पश्चाताप होऊ शकतो. लग्नाच्या आधी तुमच्या जोडीदाराला हे प्रश्न नक्की विचारा (Marriage Tips)

लग्नाच्या बंधनात बांधलं जाण्याआधीच तुमच्या होणाऱ्या जोडीदाराला काही प्रश्न विचारणं अगदी गरजेचं असतं. या प्रश्नांची उत्तरं वेळीच मिळाली नाहीत तर नंतर पश्चाताप होऊ शकतो. लग्नाच्या आधी तुमच्या जोडीदाराला हे प्रश्न नक्की विचारा (Marriage Tips)

पुढे वाचा ...
मुंबई 12 ऑगस्ट : पती-पत्नीमधलं नातं (Husband-Wife Relation) म्हणजे अगदी नाजूक नातं असतं. हे नाजूक नातं निभावणं तितकंच कठीण असतं. अर्थात मुली आपल्या आयुष्याच्या या टप्प्यावर जास्त एक्सायटेड असतात. नवीन नातं कसं असेल याबद्दल त्यांच्या मनात उत्सुकता असते. त्याचबरोबर त्यांच्या मनात सतत एक भीती असते. लग्नानंतर आपल्या पतीचं आपल्याबरोबरचं वागणं कसेल, असा प्रश्न सतत मुलींच्या मनात असतो. तुमचं लव्ह मॅरेज असो किंवा अ‍ॅरेंज मॅरेज, जीवनसाथीबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती असणं अत्यावश्यक आहे. लग्नाच्या बंधनात बांधलं जाण्याआधीच तुमच्या होणाऱ्या जोडीदाराला काही प्रश्न विचारणं अगदी गरजेचं असतं. या प्रश्नांची उत्तरं वेळीच मिळाली नाहीत तर नंतर पश्चाताप होऊ शकतो. लग्नाच्या आधी तुमच्या जोडीदाराला हे प्रश्न नक्की विचारा- 1. करिअर बऱ्याच मुलींना लग्नानंतरही आपलं प्रोफेशनल करिअर (Professional Carrier after Marraige) सुरू ठेवण्याची इच्छा असते. लग्नानंतर आपण आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असावं असं अनेक मुलींना वाटतं; पण लग्नानंतर बऱ्याचदा नवरा किंवा सासरच्यांना मुलीनं नोकरी केलेली किंवा करिअर सुरू ठेवलेलं आवडत नाही. लग्नानंतर मुलीनं पूर्ण वेळ गृहिणी बनावं अशी अनेकांची इच्छा असते. तुम्हाला तुमचं करिअर लग्नानंतर सुरू ठेवायचं असेल तर त्याबद्दल लग्नाआधीच स्पष्ट बोलून घ्या. नोकरी आणि करिअरबद्दल तुमच्या होणाऱ्या जोडीदाराला आधीच प्रश्न विचारून शंकानिरसन करून घ्या. तुमच्या करिअरमध्ये तुमचा होणारा पती तुम्हाला किती सहकार्य करणार आहे हेही माहिती करून घ्या. म्हणजे लग्नानंतर करिअर सोडण्याची किंवा करिअरवरून पती-पत्नीमध्ये मतभेद होण्याची शक्यता कमी होईल. Relationship: जर मनात भरलाच तर त्याच्याविषयी मुली करतात असा विचार; पाहतात मुलाच्या या गोष्टी 2. कुटुंब नियोजन/ फॅमिली प्लॅनिंग आपल्याकडे मुलींसाठी अजूनही हा प्रश्न थेट विचारणं थोडंसं अवघड आहे; पण हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. कुटुंब नियोजनाबद्दल तुमच्या होणाऱ्या पार्टनरचे काय विचार आहेत हा प्रश्न लग्नाआधीच विचारणं खूप गरजेचं आहे. फॅमिली प्लॅनिंगबद्दल (Family Planing) जोडीदाराचं मत आधीच जाणून घ्या. तुमचे आणि त्याचे विचार जुळले तरच लग्नासाठी होकार द्या. फॅमिली प्लॅनिंगबद्दल जोडीदाराचे आणि तुमचे विचार जुळत नसतील, तर त्यामुळे प्रोफेशनल करिअरमध्ये अनेक अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे कुटुंब नियोजनाचे विचार, किती मुलं हवी आहेत, मुलांसाठी चान्स कधी घ्यायचा या गोष्टी लग्नाआधीच स्पष्ट होणं आवश्यक आहे. 3. स्वभाव प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगवेगळा असतो. अनेकदा पती-पत्नीचा स्वभाव एकमेकांच्या पूर्ण विरुद्ध असतो. अशा परिस्थितीत वादविवाद, भांडणं आणि तक्रारीची शक्यता अर्थातच खूप जास्त असते. तुम्हाला तुमच्यातली मतभिन्नता म्हणजेच डिफरन्सेस ऑफ थॉटमुळे जास्त त्रास होत नसेल तर याचा तुमच्यावर जास्त परिणाम होणार नाही; पण हाच प्रश्न तुम्ही तुमच्या होणाऱ्या जोडीदारालाही विचारला पाहिजे. एकमेकांच्या विरुद्ध स्वभाव असताना, परस्पर मतभिन्नता असतानाही तो तुमच्याबरोबर खूश राहू शकेल का हा प्रश्न लग्नाच्या आधीच तुमच्या जोडीदाराला विचारा. त्याशिवाय तुमचा जोडीदार तुमच्याबद्दल जास्तच पझेसिव्ह असेल किंवा तो संशयी असेल, तर मात्र पुढे लग्न झाल्यावर तुम्हाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे याचा वेळीच विचार करा. 4. क्वालिटी टाइम आजकाल मुलांना वर्कप्रेशर (Work pressure) भरपूर असतं. त्यामुळे ऑफिसमधलं काम, घरची जबाबदारी हे करता करता त्यांना कुटुंबासाठी जास्त वेळ देता येणं अनेकदा शक्य होत नाही. जोडीदार कमी वेळ देत असेल तर त्यामुळे वैवाहिक आयुष्यात तणाव निर्माण होतो. त्यातही पती-पत्नी दोघंही नोकरी करणारे किंवा व्यवसाय करणारे असतील तर दोघांचे वर्किंग अवर्स म्हणजेच कामाचे तास किती आहेत, त्यात किती अंतर आहे, पती-पत्नी दोघांनाही एकमेकांबरोबर किती वेळ घालवणं शक्य आहे हे सगळं लग्नाआधीच स्पष्ट करून घ्या. म्हणजे नंतर नात्यात कटुता येणार नाही. हे चार प्रश्न प्रत्येक मुलीच्या लग्नानंतरच्या आयुष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत. याबद्दल लग्नाच्या आधीपासूनच जोडीदाराची मतं जाणून घेतली तर वैवाहिक आयुष्य नक्कीच सुखाचं, आनंदाचं होईल.
First published:

Tags: Bridegroom, Marriage

पुढील बातम्या