Home /News /lifestyle /

छोटंसं पण टकाटक; फक्त भारतच नाही तर आशियातलं सर्वात स्वच्छ सुंदर असं गाव

छोटंसं पण टकाटक; फक्त भारतच नाही तर आशियातलं सर्वात स्वच्छ सुंदर असं गाव

स्वच्छ भारत अभियान देशापुरतं मर्यादित असलं तरी या छोट्याशा गावाने अशी स्वच्छता राखली आहे की फक्त देशच नाही तर आशिया खंडात त्याचं नाव आहे.

    शिलाँग, 21 ऑक्टोबर : देशभरात प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. भारतातील (India) अनेक शहरांना याचा फटका बसत असून हिवाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रदूषणामुळे त्रास होतो. स्वच्छ भारत अभियानानंतरही (Swachh Bharat Mission) देशातील स्वच्छेतची काय अवस्था आहे हे आपण आजूबाजूला पाहतच असतो. मात्र याच भारतात आशियामधील सर्वात स्वच्छ गाव (Asia Cleanest Village) आहे, असं सांगितलं तर यावर तुमचा विश्वास बसेल का? पण हे खरं आहे. आशियातील सर्वात स्वच्छ आणि सुंदर असं गाव भारतात आहे. मेघालयची (Meghalaya) राजधानी शिलॉंगपासून 80 किलोमीटर अंतरावर असलेलं मॉलिननाँग (Mawlynnong) गाव. या गावातील नागरिकांनी या गावाला सर्वांत स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचं काम केलं आहे. या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे या गावातील मुलांना चार वर्षांचे असल्यापासून स्वच्छतेचे धडे दिले जातात. ही मुलं मोठी झाल्यानंतर त्यांना याची जाणीव असते त्यामुळे ते गाव स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. या गावामध्ये स्वच्छतेचे नियमदेखील अतिशय कडक आहेत. गावात प्लॅस्टिक पिशवी घेऊन प्रवेश करण्यास बंदी आहे. त्याचबरोबर थुंकण्यासदेखील बंदी आहे. 2007 सालापासूनच या गावात बाथरूमसारख्या सुविधा उपलब्ध असून रस्त्यावर ठेवण्यात आलेल्या बांबूच्या टोपल्यांमध्ये कचरा जमा केला जातो. हे वाचा - तांदळाच्या दाण्यांवर लिहिली संपूर्ण भगवद् गीता; मायक्रो-आर्टिस्टची जबरदस्त कमाल या गावात खासी समुदायाची लोकसंख्या सर्वाधिक आहे. गावात 95 कुटुंबांमध्ये 500 नागरिक राहत आहेत. इथं मातृसत्ताक पद्धती असून पुरुषांपेक्षा महिलांना सर्वांत जास्त अधिकार आहेत. आमच्या आजोबा आणि पणजोबांच्या काळापासून गाव स्वच्छ ठेवण्याची परंपरा असून जो स्वच्छतेमध्ये सहभागी होत नाही त्याला जेवण मिळत नसल्याचं एका ग्रामस्थानं सांगितलं. हे वाचा - जगातील सर्वात खराब आवाज कोणता? तज्ज्ञांनी शोधला, पाहा तुम्हालाही पटतंय का? 2003 मध्ये या गावात रस्ते नव्हते. मात्र डिस्कव्हरी इंडिया मॅगझिनने या गावाला सर्वांत स्वच्छ गावाचा दर्जा दिल्यानंतर रस्तेदेखील तयार झाले आणि पर्यटकांची संख्यादेखील वाढली. रस्तावर दुतर्फा झाडं लावण्यात आली, यामुळे गावाच्या सौंदर्यात आणखी भर पडली.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Village

    पुढील बातम्या