Home /News /lifestyle /

कर्क आणि सिंह राशीच्या व्यक्तींना अस्वस्थ वाटू शकतं, जाणून घ्या आजचं राशीभविष्य

कर्क आणि सिंह राशीच्या व्यक्तींना अस्वस्थ वाटू शकतं, जाणून घ्या आजचं राशीभविष्य

12 राशींसाठी कसा असेल आजचा दिवस.

    मुंबई, 18 एप्रिल : प्रत्येक दिवस सारखा नसतो. आपल्या राशीतील ग्रहांच्या बदलत्या स्थितीचा परिणाम आपल्या दिवसावर होत असतो. त्यामुळे येणारी संकटं कोणती आहे याची पूर्ण कल्पना असेल तर त्याचा सामना करणं सजह शक्य होतं. त्यासाठी जाणून घ्या 18 एप्रिलचं राशीभविष्य. मेष- आपल्यासाठी महत्त्वाचं असणारं काम आज पूर्ण कराल. कौटुंबिक पातळीवर समस्यांचा सामना करावा लागेल. वृषभ- शरीरात थकवा भरलेला आहे. त्यामुळे आज आपल्याला आरामाची आवश्यकता आहे. आजचा दिवस कामात व्यस्त जाईल. आज आपल्या मित्रांसोबत बराच वेळ घालवाल. मिथुन - करमणूक आणि मनोरंजनामध्ये आपलं मन गुंतवा. समस्यांचा सामना करावा लागेल. कर्क- आज तुम्हाला आरामाची गरज आहे. आपल्या प्रिय व्यक्तीचा मूड पुरेसा चांगला नाही. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. सिंह - आरोग्य चांगलं राहण्यासाठी नियमित व्यायाम करा. गुंतवणूकीशी संबंधित महत्त्वपूर्ण निर्णय दुसर्‍या दिवसासाठी सोडले पाहिजेत. प्रिय व्यक्तीला पुरेसा वेळ न दिल्यानं राग येईल. हे वाचा-Coronavirus lockdown : तणावामुळे मायग्रेन, घरच्या घरी करा असे उपाय कन्या- आर्थिक खर्चाचा भार एकदम वाढेल. प्रेमात एक ताकद असते. ती ताकद आपल्याला संकटाचा सामना करण्याचं बळ देते. आज चांगला दिवस, कारण आपल्याला आपले ध्येय साध्य करण्यासाठी मोठ्या संधी मिळतील. तुळ - आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम राहील. आपल्या नोकरीच्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी बरेच नवीन मार्ग आपल्यासमोर उघडणार आहेत. प्रत्येक जबाबदारी अगदी सहजपणे पार पाडाल. वृश्चिक - आज तुमचा आत्मविश्वास आणि उर्जा पातळी उच्च असेल. योग्य वेळी केलेली मदत मोठ्या संकटातून वाचवू शकेल. नवीन कल्पना आणि योजना राबवण्यासाठी दिवस चांगला आहे. धनु - आर्थिक समस्या आपल्याला त्रास देतील. गुंतवणूक करताना पूर्ण काळजी घ्या. वैवाहिक जीवनात आर्थिक सुधारणा होईल. मकर - सहकारी आणि वरिष्ठांच्या पूर्ण सहकार्यामुळे कार्यालयातील कामांना वेग मिळेल. आपण कोणत्याही स्पर्धेत प्रवेश कराल, आपला स्पर्धात्मक स्वभाव आपल्याला यशापर्यंत पोहोचवेल. कुंभ - रिअल इस्टेटमध्ये अतिरिक्त निधी गुंतविला जाऊ शकतो. प्रेमात अखंड बुडाल्यानं पार्टनरचा विचार कराल. थेट उत्तर न दिल्यास आपले सहकारी आपल्यावर रागावू शकतात. विचार करून निर्णय घ्या. मीन- आरोग्याची काळजी घ्या. गुंतवणूक करण्याचा दिवस चांगला आहे. योग्य सल्ल्यानं गुंतवणूक करा. अचानक येणाऱ्या समस्यांमुळे आपल्याला ताण येऊ शकतो. हे वाचा-कोरोना व्हायरसचा पायांमधून होतोय संसर्ग, डॉक्टरांना नवीन लक्षणं शोधण्यात यश
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Astrology and horoscope, राशीभविष्य

    पुढील बातम्या