Home /News /lifestyle /

Ashadhi Ekadashi 2022: कधी आहे आषाढी एकादशी? या दिवशी 5 गोष्टी कधीच करू नका

Ashadhi Ekadashi 2022: कधी आहे आषाढी एकादशी? या दिवशी 5 गोष्टी कधीच करू नका

आषाढी एकादशीच्या दिवशी (Ashadhi Ekadashi 2022) राज्यभरातून लाखो वारकरी पायी चालत पंढरपुरात येतात. या दिवशी आळंदी, देहू आणि पैठणसह अनेक ठिकाणांहून संतांच्या पालख्या वारीसह भूवैकुंठात दाखल होतात. एकादशीच्या या व्रताबद्दल...

  मुंबई, 13 जून : आषाढी एकादशी म्हटलं की पंढरपूरमधील (Pandharpur) लाखो वारकऱ्यांचे विलोभनिय दृष्य डोळ्यासमोर येते. आषाढी एकादशी निमित्त राज्यभरातून लाखो वारकरी (Warkari) पायी चालत पंढरपूरची वारी (Pandharpur Wari) करतात. हा दिवस महाराष्ट्रत अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. आषाढ महिण्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी म्हणतात. यंदा आषाढी एकादशी 10 जुलै रोजी (Ashadi Ekadashi 2022 Date) आहे. या दिवशी आळंदी, देहू आणि पैठणसह अनेक ठिकाणांहून संत महंतांच्या पालख्या पंढरपूरमध्ये दाखल होतात. या दिवशी ज्यांना पंढरपूरला जाणे शक्य होत नाही ते घरीच विठ्ठलाची पूजा (Ashadhi Ekadashi Vrat) करून उपवास करतात. काय आहे एकादशीची कथा  आषाढ शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला शंखासुर दैत्याचा वध झाला असे धार्मिक शास्त्रात म्हटले आहे (Ekadashi Katha). त्यामुळे याच दिवसापासून भगवान चार महिने क्षीर समुद्रात निद्रेत जातात आणि कार्तिक शुक्ल एकादशीला जागे होतात. धार्मिक मान्यतांनुसारएकादशीची अशी एक कथा आहे की एकेकाळी मृदुमान्य नावाच्या राक्षसाने भगवान शंकराची पूजा करून त्यांना प्रसन्न केले. त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊल शिवप्रभूंनी त्याला तू मृत्यू कोण त्याही देवाकडून होणार नाही, परंतु एका स्त्रीच्या हातून तुझा वध होईल' असा वर दिला. या वरामुळे उन्मत झालेला मृदुमान्यने देवांवर आक्रमन केले. या परिस्थितीत सर्व देव मदतीसाठी भगवान शंकराकडे पोहोचले. परंतु त्यांनी स्वत: त्याला वरदान दिले असल्यामुळे त्यांना काहीही करणे शक्य नव्हते.

  सुंदर, प्रभावशाली, तारुण्य.. अंकशास्त्रानुसार हा मूलांक असणारे व्यक्ती असतात नशीबवान

  यानंतर सर्व देव शिवप्रभूंसह एका गुहेत जाऊन लपले. तेथे देवांच्या श्वासातून एक देवी प्रकट झाली. या देवीचे नाव एकादशी होते. तिने मृदुमान्याचा वध करून सर्व देवांची सुटका केली. त्या दिवशी भरपूर पाऊस पडला आणि देवांना स्नान घडले. तसेच देव गुहेत लपून बसल्यामुळे त्यांना उपवासही घडला. तेव्हापासून एकादशीला उपवास करण्याची प्रथा सुरू झाली. धार्मिक मान्यतांनुसार या दिवशी भगवान विष्णुसह देवी एकादशीची मनोभावे पूजा केल्याने पापांपासून मुक्ती मिळते.

  महाकाल भस्म आरतीत बनावट ID दाखवून प्रवेश, Girlfriend सोबत आलेल्या मुस्लीम तरुणाला अटक

  एकादशीच्या दिवशी या गोष्टी करु नका प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात. यातील एक एकादशी व्रत शुक्ल पक्षात असते तर एक कृष्ण पक्षात येते. धार्मिक मान्यतांनुसार एकादशीला पान खाणे, खोटं बोलणे, जुगार खेळणे, मद्यपान करणे, मांसाहर घेणे या गोष्टी करु नयेत.
  Published by:Pooja Jagtap
  First published:

  Tags: Festival, Religion, Wari

  पुढील बातम्या