Home /News /lifestyle /

अफगाणिस्तानच्या सत्तापालटाची झळ आपल्या स्वयंपाकघरापर्यंत! तालिबानमुळे फोडणीचा तडका झाला महाग

अफगाणिस्तानच्या सत्तापालटाची झळ आपल्या स्वयंपाकघरापर्यंत! तालिबानमुळे फोडणीचा तडका झाला महाग

गुजरात, महाराष्ट्र या भागात देखील फोडणीसाठी हिंगाचा वापर केला जातोच.

गुजरात, महाराष्ट्र या भागात देखील फोडणीसाठी हिंगाचा वापर केला जातोच.

वाह काय फोडणी बसली आहे आमटीला! असं म्हणून ताव मारून जेवण्याचे दिवस आता गेले.

    नवी दिल्ली, 18 ऑगस्ट : रोजच्या जेवणातले पदार्थ बनवण्यासाठी वापरण्यात येणारा महत्त्वाचा पदार्थ म्हणजे हिंग (Asafoetida). भारतीयांच्या स्वयंपाक घरामध्ये (Kitchen) हिंगाची डबी किंवा मसाल्याच्या डब्यात हिंगाचं स्थान अढळ आहे. जेवणाची चव त्याच्या फोडणीमुळे वाढते आणि फोडणीसाठी हिंग लागतंच. हिंग चवीबरोबरच औषधीही (Medicine) आहे. पोटा संदर्भातल्या अनेक आजारांमध्ये (Stomach Related Diseases) हिंगाचा उपयोग केला जातो. मात्र, आपल्या रोजच्या जीवनामध्ये (Everyday Life) वापरलं जाणार हिंग हा मसाल्याचा पदार्थ भारतातला नाही. हिंग मध्य आशियामधून भारतामध्ये (Meade Est to India) आलं आणि नंतर आपल्या जेवणामधला अविभाज्य भाग झालं. मुघल साम्राज्याच्या काळामध्ये भारतामध्ये हिंग आलं असं सांगितलं जातं. पण, काहींच्यामते आयुर्वेदात हिंगाचा उल्लेख ‘हिंगु’ या नावाने आहे. आयुर्वेदात हिंगाचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. हिंग पचनशक्ती सुधारण्यासाठी मदत करतं. त्यामुळे पोटात गॅसेस झाला तर हिंग पाण्याबरोबर घेतल्यास सांगितलं जातं. उग्र वासामुळे हिंगला ‘डेव्हिल्स डंक’ असंही म्हणतात. तर, इराणमध्ये लिंगाला ‘फुड ऑफ गॉड’ असंही म्हटलं जातं. भारताच्या केरळ, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यांमध्ये सांबार मध्ये हिंग आवर्जून वापरलं जातं. तर, गुजरात, महाराष्ट्र या भागात देखील फोडणीसाठी हिंगाचा वापर केला जातोच. पण, हिंगाचं उत्पादन खरंतर भारतामध्ये घेतलं जात नाही. भारतामध्ये हिंग इराण, अफगाणिस्तान उज्बेकिस्तान आणि कजाकिस्तान मधून आयात केलं जातं. भारतामध्ये दरवर्षी 1200 टन हिंगाची आयात केली जाते. यासाठी 600 कोटी रुपये मोजावे लागतात. म्हणूनच याची किंमत देखील जास्त असते. यामध्ये अनेक प्रकार आहेत. त्यामध्ये अफगाणी किंवा पठाणी हिंगाला जास्त मागणी असते. काबुली सफेद आणि लाल हिंग असे हिंगाचे दोन प्रकार आहेत. (‘या’ उपायांनी मिनिटात पाली घर सोडून पळून जातील; संपेल कायमचा त्रास) जगभरात हिंगाच्या 130 प्रजाती आहेत. ‘फेरुला फेटिडा’ या नावाने हिंगाच्या झाडाला ओळखलं जातं. हिंग या झाड्याच्या फुलांपासून, देठापासून, पानांपासून, किंवा फळांपासून मिळत नाही तर, मुळांच्या रसापासून हिंग तयार होतो. आता अफगाणिस्तानमध्ये तालिबानचं राज्य आलं आहे. तिथल्या उलथापालथीमुळे हिंग आयात करणं कठीण होऊन बसणार आहे. सध्या भारतामध्ये हिंग लागवडीसाठी पावलं उचलली गेली आहेतय. त्यासाठी कीउन्सिल ऑफ सायंटिफि अ‍ॅन्ड इंडस्ट्रियल रिसर्च अँड म्हणजेच CSIR ने उचललेली आहेत. गेल्या वर्षी म्हणजेच 2020 मध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये हिमाचल प्रदेशमध्ये लाहोल व्हॅलीमध्ये शेतकऱ्यांनी हिंगाच्या शेतीला सुरुवात केली आहे. (नको सुगामेवा खराब होण्याची चिंता! असा साठवून ठेवला तर नाही लागणार किडे) यासाठी हिमालयन बायोरिसोर्स टेक्नॉलॉजीने सहकार्य केलं आहे.  CSIR कडून देखील या भागामध्ये हिंगाच्या शेतीला प्रोत्साहन दिले जातं आहे. 15 ऑक्टोबर 2020 लाहोल व्हॅलीमध्ये क्वारिंग गावांमध्ये हिंगाच्या शेतीसाठी बीजरोपण करण्यात आलं आहे. यासाठी फेरूला एस्टोफटिडाच्या झाडांचं बी वापरण्यात आलं आहे. हिंगाच्या एका रोपापासून अर्धा किलो हिंग मिळू शकतो मात्र, हिंगाच्या रोपाची पूर्ण वाढ होऊन त्यापासून हिंग तयार करण्यासाठीरस मिळेपर्यंत 4 ते 5 वर्षे वाट पाहावी लागते. शुद्ध हिंगाची किंमत 45 ते 40 हजार रुपयांवर असते. (दूध पिताना एक छोटीशी चूक पडेल महागात; तुम्हालाही अशी सवय तर नाही ना?) म्हणजेच आपल्या देशामध्ये हिंगाची निर्मिती होण्यासाठी आणखी किमान 4 वर्षे वाट पाहावी लागणार आहे. पण, त्यानंतर हा प्रयोग यशस्वी झाला तर शेतकऱ्यांना लाखोंनी फायदा होणार आहे. याशिवाय हिंगसाठी आपल्याला अफगाणिस्थान सारख्या देशावर अवलंबून राहावं लागणार नाही. पुढच्या काळामध्ये हिमालयाच्या कुशीमध्ये लडाख हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि अरुणाचल प्रदेश या भागात देखील हिंगाची शेती होऊ शकते. (शी...! व्हॅनिला फ्लेव्हरची निर्मिती 'यापासून' होते? समजलं तर वापरच बंद कराल!) कारण या भागातलं वातावरणं हिंगाच्या शेतीसाठी पूरक म्हणजे शुष्क थंड आणि कोरडं आहे.  मात्र पुढचे 4 ते 5 वर्षे हिंगाच्या निर्मिती साठी वाट पहावी लागणार आहे. त्यामुळे अफगाणिस्तानात सत्तापालटानंतर भारतीयांच्या ताटातलं हिंग महाग होणार हे निश्चित मानलं जात आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Farmer, Food, Lifestyle, Taliban

    पुढील बातम्या