Home /News /lifestyle /

खाद्य पदार्थांमध्ये हिंगाचा अतिवापर ठरतो हानीकारक; या लोकांनी विशेष काळजी घेण्याची गरज

खाद्य पदार्थांमध्ये हिंगाचा अतिवापर ठरतो हानीकारक; या लोकांनी विशेष काळजी घेण्याची गरज

Asafoetida or Hing Side Effects: हिंगाचे प्रमाण लक्षात घेतले नाही किंवा हिंग जास्त प्रमाणात खाल्ल्यास अतिसार, गॅस आणि पोटात जळजळ होण्याची समस्या होऊ शकते. यासोबतच ओठांवर सूज येणे, डोकेदुखी, रक्तदाबाची समस्याही समोर येऊ शकते तसेच..

पुढे वाचा ...
    मुंबई, 02 डिसेंबर : असे अनेक खाद्य पदार्थ आहेत ज्यात हिंग (Asafoetida) टाकल्याने त्यांची चव अनेक पटींनी वाढते. काही शारीरीक समस्या कमी करण्यासाठीही हिंग घरगुती उपाय म्हणून हिंग वापरला जातो. विशेषत: पोट आणि पचनाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी हिंगाचा चांगला उपयोग होतो. हिंगाचे अनेक आरोग्यदायी फायदे असले तरी काही बाबतीत हिंग हानीकारकही ठरू शकतो. हिंगाच्या अतिसेवनामुळे आरोग्याला फायद्याऐवजी नुकसान होते. हिंगाच्या अतिसेवनाने आरोग्याला काय नुकसान होऊ शकते (Asafoetida or Hing Side Effects) त्याबाबत सविस्तर जाणून घेऊया. अतिसार आणि गॅस गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी हिंगाचा वापर केला जातो. परंतु, हिंगाचे प्रमाण लक्षात घेतले नाही किंवा हिंग जास्त प्रमाणात खाल्ल्यास अतिसार, गॅस आणि पोटात जळजळ होण्याची समस्या होऊ शकते. यासोबतच ओठांवर सूज येणे, डोकेदुखी, रक्तदाबाची समस्याही समोर येऊ शकते. गर्भधारणा आणि स्तनपान हिंगचे जास्त प्रमाणात सेवन करणे गर्भवती महिलांसाठी हानिकारक ठरू शकते. एवढेच नाही तर हिंग जास्त प्रमाणात खाल्ल्याने काही प्रकरणांमध्ये गर्भपात होऊ शकतो. स्तनपान करणाऱ्या महिलांना मोठ्या प्रमाणात हिंग खाणे महागात पडू शकते. कारण स्तनपानाद्वारे हिंग बाळाच्या आहाराचा एक भाग बनू शकते, ज्यामुळे बाळाचे आरोग्य बिघडण्याचा धोका असतो. हे वाचा - औषधांच्या पाकिटांवर का असते अशी लाल पट्टी? एक्सपायरी डेट इतकीच ती समजून घेणं आहे गरजेचं उच्च आणि कमी रक्तदाब हिंगाच्या अतिसेवनामुळे उच्च आणि कमी रक्तदाबाची समस्या देखील उद्भवू शकते. वास्तविक हिंग हे नैसर्गिक रक्त पातळ करणारे म्हणूनही ओळखले जाते. हे रक्त पातळ करण्याचेही काम करते. एवढेच नाही तर हिंगामध्ये कौमरिन नावाचे एक संयुग आढळते, जे रक्ताच्या गुठळ्या तयार होण्यास प्रतिबंध करते. हे वाचा - Healthy Life: हा टेस्टी ब्रेकफास्ट आहे अनुष्का शर्माच्या सडपातळ आरोग्याचे गुपित डोकेदुखी आणि चक्कर येणे कधी कधी हिंगाच्या अतिसेवनाने डोकेदुखी आणि चक्कर येण्याचा त्रास देखील होऊ शकतो. हिंगाचे हे दुष्परिणाम सामान्यतः काही तास टिकतात, परंतु काही असले तरी जास्त प्रमाणात हिंग खाण्यापूर्वी एकदा विचार करणे आवश्यक आहे. (सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Health Tips

    पुढील बातम्या