मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी हिंग आहे खूप फायदेशीर; फक्त असा करा त्याचा वापर

रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी हिंग आहे खूप फायदेशीर; फक्त असा करा त्याचा वापर

आयुर्वेदानं सांगितल्यानुसार, यामुळं रक्तदाब नियंत्रित राहतो आणि पचनक्रियाही चांगली राहते. हिंग शरीरात नैसर्गिकरीत्या रक्त पातळ करण्याचं काम करतो. यामुळंही हिंगाचं सेवन अधिक फायदेशीर आहे.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर: हिंगाच्या (Hing) वापरानं जेवणाची चव आणि सुगंध वाढतो. शिवाय, रक्तदाबाच्या रुग्णांनी हिंगाचं सेवन केल्यास उच्च रक्तदाबही (High Blood Pressure) कमी होतो. हिंग मर्यादित प्रमाणात खाल्ल्यानं आरोग्याला फायदा होतो. आयुर्वेदानं सांगितल्यानुसार, यामुळं रक्तदाब नियंत्रित राहतो आणि पचनक्रियाही चांगली राहते. हिंग शरीरात नैसर्गिकरीत्या रक्त पातळ करण्याचं काम करतो. यामुळंही हिंगाचं सेवन अधिक फायदेशीर आहे, असं झी न्यूजनं दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. हिंगामध्ये असलेला कुमेरिन (Coumarin) हा विशेष घटक शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो आणि रक्ताच्या गुठळ्या होण्यास प्रतिबंधित करतो. तसंच, कोलेस्टेरॉलची पातळीही योग्य ठेवतो.

कोमट पाण्याबरोबर हिंग

हिंग पाण्यासोबतही घेऊ शकता. एक ग्लास कोमट पाण्यात एक चतुर्थांश चमचा किंवा चिमूटभर हिंग घाला आणि तो चांगला मिसळा. रिकाम्या पोटी याचं सेवन करावं. याशिवाय, तुम्ही त्यात चिमूटभर हळदही घालू शकता. हिंगाचं पाणी चयापचय योग्य ठेवण्यास मदत करते आणि रक्तदाबदेखील नियंत्रित ठेवते.

हे वाचा - PM Kisan: खूशखबर! शेतकऱ्यांना 10व्या हप्त्यात 4000 रुपयांसह मिळणार 3 मोठे फायदे, वाचा सविस्तर

कॅप्सूल स्वरूपात देखील घेता येईल

बाजारात हिंगाच्या गोळ्या आणि कॅप्सूल मिळतील. याच्या सेवनानं पचनक्रिया व्यवस्थित राहते आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासही मदत होते. परंतु, गोळी किंवा कॅप्सूल घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

मध आणि आल्यासह

हिंगासोबत मध आणि सुंठ पावडर मिसळून सेवन करता येतं. यामुळं दमा आणि श्वसनाच्या समस्यांमध्ये आराम मिळेल.

हे वाचा - Types of Headaches: डोकंदुखीचे नेमके किती आहेत प्रकार? त्याची कारणं आणि घरगुती उपाय जाणून घ्या

हिंग, ओवा आणि सैंधव मीठ

जेवण झाल्यावर अर्धा चमचा ओवा घ्या, त्यात चिमूटभर सैंधव मीठ आणि चिमूटभर हिंग घाला. हे मिश्रण कोमट पाण्यासोबत प्या. यामुळं पोटदुखी, पोट फुगणं आणि गॅसची समस्याही दूर होईल. तुम्हाला हिंगाची अ‌ॅलर्जी किंवा इतर कोणत्याही आरोग्य समस्या असल्यास, डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच हिंग घ्या. तसंच, त्याचं प्रमाण नेहमी लक्षात ठेवा. हिंग जास्त प्रमाणात खाल्ल्यानं नुकसान होऊ शकतं.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Health, Health Tips