मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

भावासाठी बहिणीने आपल्या शरीरावर फिरवला 'चाकू'; रक्षाबंधनाचं गिफ्ट म्हणून काढून दिली आपली किडनी

भावासाठी बहिणीने आपल्या शरीरावर फिरवला 'चाकू'; रक्षाबंधनाचं गिफ्ट म्हणून काढून दिली आपली किडनी

किडनी देऊन बहिणीने वाचवला भावाचा जीव.

किडनी देऊन बहिणीने वाचवला भावाचा जीव.

बहिणीने भावाला किडनी दान करून रक्षाबंधनाचं सर्वात अमूल्य आणि अनोखं असं गिफ्ट दिलं आहे.

  • Published by:  Priya Lad
चंदीगड, 10 ऑगस्ट : रक्षाबंधन... बहीण-भाऊ एकमेकांची रक्षा करण्याचं वचन देतात. हेच वचन खऱ्या अर्थाने निभावलं एका बहिणीने. जिने आपल्या भावाचा जीव वाचवला आहे. सर्जरीची भीती वाटणाऱ्या या बहिणीने भावासाठी न घाबरता आपल्या शरीरावर चाकू फिरवला आणि आपल्या शरीरातील किडनी त्याला काढून दिली. बहिणीने आपली किडनी भावाला दान करत त्याला नवं आयुष्य दिलं आहे.  रक्षाबंधनाचं सर्वात अमूल्य आणि अनोखं असं गिफ्ट बहिणीने भावाला दिलं आहे. हरयाणाच्या गुरगावमध्ये राहणारा 29 वर्षांचा अमन बत्रा 2013 सालापासून किडनीच्या आजाराने त्रस्त आहे. गेल्या 9 वर्षांपासून तो डायलिसिसवर आहेत. त्यांना किडनी प्रत्यारोपणाची गरज होती. पण त्याचे आई-वडिलांची किडनी देऊ शकत नव्हते. शेवटी त्याची बहीण चंद्रा ग्रोवरने आपली किडनी त्याला देण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलँडला राहणारी चंद्रा भारतात आली आणि तिने आपल्या भावाला किडनी दान केली. हे वाचा - मानलं भावा तुला! अवघ्या 80 रुपयांत 7 बहिणींसाठी Raksha bandhan gifts; हा जबरदस्त जुगाड एकदा पाहाच रिपोर्टनुसार बत्राने सांगितलं, त्याच्या आईवडिलांना हाय ब्लड प्रेशर आहे. आईला डायबिटीजही आहे. मोठी बहीण 4-5 वर्षांपासून मला सर्जरी करायला सांगत होती. आपली किडनी द्यायला ती तयार होती. पण तिला सर्जरीची भीती वाटायची. त्यामुळे तिची किडनी घ्यायला आमचंही मन तयार होत नव्हतं. पण सर्जरीचीही कितीही भीती वाटत असली तरी भावाचा जीव वाचवण्यासाठी बहिणीने आपल्या भीतीवरही मात केली. भीती बाजूला सारत तिने बिनधास्तपणे आपल्या शरीरावर चाकू फिरवून घेतला. म्हणजे ती सर्जरीला सामोरी गेली. तिच्या शरीरातील किडनी काढून भावाच्या शरीरात प्रत्यारोपित करण्यात आली. ज्यामुळे त्याची 9 वर्षांनंतर डायलिसिसमधून सुटका झाली आहे आणि त्याचा जीवही वाचला आहे.
First published:

Tags: Haryana, Health, Lifestyle, Organ donation, Raksha bandhan, Relation

पुढील बातम्या