• Home
  • »
  • News
  • »
  • lifestyle
  • »
  • दीर्घकाळ लॅपटॉप मांडीवर ठेवणं पडू शकतं महागात; प्रजननक्षमतेवर होतोय परिणाम

दीर्घकाळ लॅपटॉप मांडीवर ठेवणं पडू शकतं महागात; प्रजननक्षमतेवर होतोय परिणाम

Laptop

Laptop

दीर्घकाळ लॅपटॉप मांडीवर ठेवण्याचे गंभीर दुष्परिणाम समोर आले आहेत.

  • Share this:
नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी: कोरोना (Coronavirus) संकटामुळे आपल्या जगण्याच्या पद्धतीवरही परिणाम झाला आहे. कोरोनामुळे गेल्या काही काळापासून अनेकांना घरातूनच काम (Work From Home) करावं लागत आहे. सतत ऑनलाइन असणं बहुतेकांसाठी अनिवार्य आहे. घरात राहून काम करावं लागत असण्याचे काही फायदे आहेत तसे तोटेही आहेत. कॉम्प्युटर (Computer) आणि लॅपटॉपवर (Laptop) घालवल्या जाणाऱ्या वेळेत वाढ झाली आहे. घरातून काम करताना अनेकजण लॅपटॉप मांडीवर ठेवून काम करतात. दीर्घकाळ लॅपटॉप मांडीवर ठेवून काम करणाऱ्यांच्या आरोग्यावर विशेषतः पुरुषांच्या फर्टिलिटीवर (Male Fertility) अर्थात प्रजननक्षमतेवर दुष्परिणाम होण्याची शक्यता अमेरिकेतील संशोधकांनी वर्तवली आहे. ‘Fertility and Sterility या वैद्यकीय जर्नलमध्ये अमेरिकी वैज्ञानिकांनी दिलेल्या अहवालात या गोष्टीचा उल्लेख करण्यात आला आहे. दीर्घकाळ लॅपटॉप वापरल्यानं पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर विपरfत परीणाम होत असल्याचा निष्कर्ष मेडिकल न्‍यूज टुडे या रिपोर्टमध्ये नोंदवण्यात आला आहे. लॅपटॉपमधून निर्माण होणारी ऊर्जा (Heat) पुरुषांच्या टेस्टिकलला (Testicle) नुकसान पोहोचवते. यामुळे याचा परिणाम पुरुषांच्या वीर्यावर होऊन, स्पर्म्सची संख्या कमी होते, पर्यायानं प्रजननात अडचणी निर्माण होण्यास सुरुवात होते. हे वाचा - Poop Transplant मुळे आयुष्य वाढणार; कॅन्सरग्रस्तांसाठी वरदान ठरणार विचित्र उपचार लॅपटॉपच्या रेडिएशनमुळे (Radiation) मोठा तोटा होत असल्याचं या संशोधनातून समोर आलं आहे. लॅपटॉपमधून निर्माण होणारी ऊर्जा त्वचा आणि आतील ऊतींना नुकसान पोहोचवते. या ऊर्जेमुळे पुरुषांच्या टेस्टिकलचं तापमान वाढतं आणि याचा परिणाम स्पर्म्सच्या दर्जावर होतो. त्यामुळे प्रदीर्घकाळ लॅपटॉप अंगावर ठेवून काम करणं पुरुषांसाठी अधिक धोकादायक ठरत असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. हे वाचा - कोरोना लॉकडाऊनमध्ये हजारो नवजात चिमुकल्यांचा मृत्यू; मुंबईतील आकडेवारी धक्कादायक स्‍टेट यूनिव्हर्सिटी ऑफ न्‍यूयॉर्कच्या संशोधकांनी टेबलवर लॅपटॉप ठेवून काम करण्याचा सल्ला दिला आहे. 28 मिनिटांपेक्षा जास्त काळ गुडघ्यावर, मांडीवर लॅपटॉप ठेवून काम करू नये. दोन्ही गुडघे एकत्र करून त्यावर लॅपटॉप किंवा लॅपटॉप पॅड ठेवून काम करा असा सल्लाही संशोधकांनी दिला आहे.
Published by:news18 desk
First published: