मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /भारतीयांमध्ये वाढतंय लठ्ठपणाचं प्रमाण; 53 टक्के लोकांना हृदयविकाराचा धोका, हे शहर अव्वल

भारतीयांमध्ये वाढतंय लठ्ठपणाचं प्रमाण; 53 टक्के लोकांना हृदयविकाराचा धोका, हे शहर अव्वल

लठ्ठपणा आणि उच्च रक्तदाबामुळे (High BP) 53 टक्के भारतीयांना हृदयविकाराचा धोका आहे. त्यामुळे भारतीयांनी आपल्या फिटनेसकडे लक्ष देण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.

लठ्ठपणा आणि उच्च रक्तदाबामुळे (High BP) 53 टक्के भारतीयांना हृदयविकाराचा धोका आहे. त्यामुळे भारतीयांनी आपल्या फिटनेसकडे लक्ष देण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.

लठ्ठपणा आणि उच्च रक्तदाबामुळे (High BP) 53 टक्के भारतीयांना हृदयविकाराचा धोका आहे. त्यामुळे भारतीयांनी आपल्या फिटनेसकडे लक्ष देण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.

    नवी दिल्ली 01 एप्रिल : बदलत्या जीवशैलीमुळे (Life Style) आणि कोरोना महामारीमुळे (Corona pandemic) आपली शारिरीक हालचाल कमी झाली आहे. याचा परिणाम आपल्या वजनावर होत आहे. सध्याच्या काळात लठ्ठपणा (Obesity) ही अतिशय चिंतेची बाब ठरत आहे. लठ्ठपणामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळतं हे सर्वांना माहिती असेल. नुकत्याच झालेल्या सर्व्हेमध्ये यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालं आहे. देशातील अर्ध्याहून अधिक लोकसंख्येला हृदयविकाराचा (Heart Attack) धोका आहे.

    लठ्ठपणा आणि उच्च रक्तदाबामुळे (High BP) 53 टक्के भारतीयांना हृदयविकाराचा धोका आहे. त्यामुळे भारतीयांनी आपल्या फिटनेसकडे लक्ष देण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. या सर्व्हेतून भारतातील सर्वांत जास्त लठ्ठ लोक राहत असलेल्या शहराचं नावही समोर आलं आहे. झी न्यूजनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

    Belly Fat Tips: सुटलेल्या पोटाची चरबी कमी करण्याचा जबरदस्त उपाय; फक्त मेथीचा असा करा उपयोग

    इंडिया हेल्थ लिंक (India Health Link) आणि हील फाउंडेशननं (Heal Foundation) नुकताच मुंबई, बेंगळुरू, दिल्ली आणि चेन्नई या भारतातील प्रमुख शहरांमध्ये लठ्ठपणामुळे उद्भवणाऱ्या आजारांशी संबंधित एक सर्व्हे केला. या सर्व्हेनुसार दिल्लीत (Delhi) सर्वाधिक लठ्ठ लोक आढळले आहेत. एकूण एक हजार 461 लोकांचा या सर्व्हेमध्ये सहभाग होता. यापैकी 77 टक्के पुरुष होते तर 23 टक्के महिला होत्या. या सर्व्हेतील निष्कर्षांनुसार, 26 ते 40 वयोगटातील 46 टक्के लोकांना आणि 41 ते 60 वयोगटातील 34 टक्के लोकांना हृदयविकाराचा धोका आहे. बीएमआय (BMI) म्हणजेच बॉडी मास इंडेक्स जास्त असल्यास ब्लड प्रेशरचा धोका जास्त असतो.

    वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, जर तुमचा बॉडी मास इंडेक्स (BMI) 24 पेक्षा जास्त असेल तर तुम्ही लठ्ठ आहात. जर बीएमआय 30 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला शस्त्रक्रिया करावी लागू शकते. बीएमआय मोजण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. 'वजन / (उंची) 2' बीएमआय मोजण्याचं सूत्र आहे. बीएमआय मोजण्याचा आणखी एक सोपा मार्ग म्हणजे महिलांच्या कंबरेचा घेर 35 इंच आणि पुरुषांचा 40 इंचापेक्षा जास्त असेल तर ती व्यक्ती लठ्ठ मानली जाते.

    वजन कमी करण्यासाठी पोहण्यासारखा व्यायाम नाही; योग्य वेळ आणि स्ट्रोक फक्त समजून घ्या

    दिल्लीतील 23 टक्के लोकांना हाय ब्लड प्रेशरची समस्या आढळली आहे तर मुंबईतील रहिवाशांमध्ये हे प्रमाण 15 टक्के इतकं आहे. सर्व्हे करणाऱ्या कंपनीच्या मते, कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची लाईफस्टाईल फारच खराब आहे. लठ्ठ व्यक्तींना ब्लड प्रेशरचा धोका 41 टक्क्यांनी जास्त असल्याचं सर्व्हेमध्ये म्हटलं आहे. बीएमआय जास्त असेल तर हाय ब्लडप्रेशरचा धोकाही आणखी जास्त असतो. दिल्लीत राहणार्‍या 26 ते 40 वयोगटातील 46 टक्के लोकांना हृदयविकाराचा धोका आहे. त्याच सर्वेक्षणानुसार, 50 टक्के लोकांचं वजन जास्त आहे आणि 38 टक्के लोक इतके लठ्ठ आहेत की त्यांच्या लठ्ठपणा आजारपणाच्या श्रेणीत येतो.

    एकूणच सध्या लठ्ठपणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करत असल्याचं या सर्व्हेतील निष्कर्षांमधून समोर आलं आहे.

    First published:

    Tags: Delhi, Health, Heart Attack, Weight gain, Weight loss