आता काय म्हणावं! कुत्र्यांची झाली भांडणं; म्हणून बॉलिवूड अभिनेत्याने बायकोला दिला घटस्फोट

आता काय म्हणावं! कुत्र्यांची झाली भांडणं; म्हणून बॉलिवूड अभिनेत्याने बायकोला दिला घटस्फोट

बॉलिवूड अभिनेता अरुणोदय सिंह (arunoday singh) ने कॅनेडियन पत्नी ली एल्टनला या विचित्र कारणावरून घटस्फोट दिला आहे.

  • Share this:

प्रतीक अवस्थी/भोपाळ, 15 सप्टेंबर : एकमेकांसह न पटणं, विचार न जुळणं, कुटुंबातील वाद, छळ या कारणांमुळे घटस्फोट होतात. यामुळेच काही बॉलिवूड सेलिब्रिटींचाही घटस्फोट (Divorce) झाला आहे. त्यामुळे एखाद्या सेलिब्रिटीचा घटस्फोट झाला यात काही नवं नाही. मात्र प्राण्यांच्या भांडणावरून माणसांचा घटस्फोट होणं हे मात्र खरंच आश्चर्यकारक आहे. बॉलिवूड अभिनेता अरुणोदय सिंहने (arunoday singh) याच कारणामुळे आपल्या पत्नीला घटस्फोट दिला आहे.  अरुणोदय का मध्य प्रदेशमधील काँग्रेस नेते अजय सिंह यांचा सुपूत्रही आहे.

बॉलिवूड अभिनेता अरुणोदय सिंह आणि कॅनडाची रहिवाशी असलेली ली एल्टन यांचं नोव्हेंबर 2016 मध्ये लग्न झालं. भोपाळमधील विशेष विवाह कायद्याअंतर्गत त्यांनी लग्न केलं. लग्नाच्या काही दिवसांतच दोघांमध्येही वाद होऊ लागले. तीन वर्षांच्या आतच त्यांच्यावर घटस्फोटाची वेळ आली. सूत्रांच्या माहितीनुसार या दोघांच्या वादाची सुरुवात झाली ती कुत्र्यांच्या भांडणापासून. ली एल्टन आणि अरुणोदय या दोघांच्याही कुत्र्यांची आपसात लढाई झाली आणि त्यानंतर दोघांमध्येही वाद वाढत गेले. याशिवाय अरुणोदयने एल्टनवर अनेक गंभीर आरोपही लावले होते.

हे वाचा - मुलाच्या सासूवरच जडलं प्रेम; तिच्यासाठी 55 वर्षांच्या व्यक्तीने हद्दच गाठली

अरुणोदयने 2019 मध्ये कॅनडामध्ये येणं जाणंही बंद केलं आणि 10 मे 2019 रोजी भोपालच्या फॅमिली कोर्टात ली एल्टनविरोधात घटस्फोटासाठी अर्ज केला. एल्टन यावेळी कॅनडामध्ये गेली होती. तिनं अरुणोदयविरोधात मुंबईत केस दाखल केली होती. यादरम्यान 18 डिसेंबर 2019 मध्ये ली एल्टनला काहीही माहिती न देता भोपाळ कौटुंबिक न्यायालयाने घटस्फोटाचे आदेश दिले.

हे वाचा - Corona काळात आपण खोटं बोलायलाही शिकलो का? साथीने बनवलंय अप्रामाणिक - Survey

अरुणोदय याने आपल्याला एकतर्फी घटस्फोट दिला, असं म्हणत ली एल्टनने जबलपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. अरुणोदयने घटस्फोटाबाबत तिला काहीही माहिती दिली नव्हती आणि एकतर्फी घटस्फोट घेतला आहे. त्यामुळे भोपाळ न्यायालयाचा आदेश रद्द करावा, अशी मागणी तिने याचिकेत केली आहे. जबलपूर उच्च न्यायालयात या याचिकेवर सुनावणी झाली. याबाबत भोपाळ कौटुंबिक न्यायालयातील नोंदी  मागवण्यात आल्या आहेत. 6 ऑक्टोबरला पुढील सुनावणी होणार आहे.

Published by: Priya Lad
First published: September 15, 2020, 2:54 PM IST

ताज्या बातम्या