मुंबई, 13 डिसेंबर : विज्ञानाच्या प्रगतीने अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टी प्रत्यक्षात घडत आहेत. महिलेच्या गर्भाशयाशिवाय अपत्य जन्म घेत आहेत. जगातील पहिल्या 'कृत्रिम गर्भ सुविधे'च्या संकल्पनेबाबत मोठा खुलासा झाला आहे. ActoLife नावाची सुविधा दरवर्षी 30,000 पर्यंत मुलं जन्माला घालत आहेत. येमेनी मॉलिक्यूलर बायोटेक्नॉलॉजिस्ट हाशम अल-घैली यांनी यासंदर्भात एक अॅनिमेशन व्हिडिओ जारी केला आहे. इंटरनेटवर हा व्हिडिओ पाहून लोक हैराण झाले आहेत. हा व्हिडिओ एखाद्या सायन्स फिक्शन चित्रपटासारखा दिसत आहे.
सुपर इनोव्हेटर्सच्या अहवालानुसार, सध्या ही सुविधा प्रत्यक्षात अस्तित्वात नाही. पण या सुविधेचा उद्देश लोकसंख्या घटणाऱ्या देशांना मदत करणे हा असल्याचा दावा व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे. 8:39 मिनिटांच्या अॅनिमेशन व्हिडिओमध्ये दावा करण्यात आला आहे की ही सुविधा पूर्णपणे अक्षय ऊर्जेद्वारे चालविली जाईल. यासोबतच अॅक्टोलाइफच्या सुविधेसाठी प्रयोगशाळेत मोठ्या प्रमाणात पॉड्स किंवा कृत्रिम गर्भ असणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. त्याच्या आत मुलांचे संगोपन केले जाईल.
जारी केलेल्या व्हिडिओमध्ये, व्हॉईसओव्हरद्वारे असे म्हटले आहे की इक्टोलाइफ वंध्य जोडप्यांना गर्भधारणा करण्यास आणि त्यांच्या मुलाचे खरे पालक बनण्याची परवानगी देते. तसेच कर्करोग किंवा इतर गुंतागुंतीमुळे ज्या महिलांचे गर्भाशय शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकण्यात आले आहे त्यांच्यासाठी हे वरदान आहे. या सुविधेत 75 प्रयोगशाळा असल्याचेही व्हिडिओमध्ये नमूद करण्यात आले आहे. या प्रयोगशाळेत 400 पॉड्स कृत्रिम गर्भाशय विकसित करण्यास सक्षम आहेत.
पॉड्स आईच्या गर्भाशयाच्या आतील परिस्थितीची नक्कल करण्यासाठी आणि न जन्मलेल्या मुलाशी जुळवून घेण्यासाठी डिझाइन केल्या आहेत. यासह, ग्रोथ पॉड्समध्ये सेन्सर देखील असतील जे बाळाच्या हृदयाचे ठोके, रक्तदाब, श्वासोच्छवासाची गती आणि ऑक्सिजन पातळी यासारख्या महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष ठेवतील. व्हिडिओमध्ये असा दावा करण्यात आला आहे की असा गर्भ कोणत्याही संभाव्य अनुवांशिक विकृतींचेही निदान करू शकतो.
इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF) तंत्रज्ञानाचा वापर या ग्रोथ पॉड्समधून शुक्राणू आणि अंडी तयार करण्यासाठी आणि नंतर अनुवांशिकदृष्ट्या उत्कृष्ट भ्रूण निवडण्यासाठी केला जातो. व्हिडिओनुसार, केसांचा रंग, डोळ्यांचा रंग, उंची, बुद्धिमत्ता आणि त्वचेचा टोन यांसारख्या मुलाचे 'कोणतेही वैशिष्ट्य' देखील 300 हून अधिक जनुकांद्वारे अनुवांशिकरित्या संपादित केले जाऊ शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.